AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतजी, एकवेळ डॉक्टरांची माफी मागू नका, पण जनतेची मागा, ‘कंपाऊंडर’ वादावर ‘मार्ड’चे डॉक्टर आक्रमक

संजय राऊत यांचे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे असून डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे, असे केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर दीपक मुंढे यांनी पत्रात म्हटले आहे.

संजय राऊतजी, एकवेळ डॉक्टरांची माफी मागू नका, पण जनतेची मागा, 'कंपाऊंडर' वादावर 'मार्ड'चे डॉक्टर आक्रमक
| Updated on: Aug 17, 2020 | 5:10 PM
Share

मुंबई : डॉक्टर आणि कंपाऊंडर यांच्याविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केल्यानंतर ‘मार्ड’चे डॉक्टर आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी डॉक्टरांची नाही, तर सर्वसामान्य जनतेची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर दीपक मुंढे यांनी केली आहे. (MARD asks Sanjay Raut to apologize on Doctor Compounder Statement)

“गेल्या काही काळामध्ये विशेषत: ग्रामीण, आदिवासी व झोपडपट्टी भागांमध्ये कंपाऊंडर म्हणजेच बोगस डॉक्टरांचे फावल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची मोठी हानी होत होती व आहे. त्याविरुद्ध विविध सामाजिक संघटना, सरकारचे सल्लागार, डॉक्टरांच्या संघटना वेळोवेळी या बोगस डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या मागण्या करत आल्या आहेत व सरकार आणि प्रशासन सुद्धा वेळोवेळी या बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करत असते.” याकडे डॉ. दीपक मुंढे यांनी लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : मी डॉक्टरांचा अपमान केला नाही, कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून टोकाची भूमिका घेऊ नये : संजय राऊत

“संजय राऊत यांचे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे असून डॉक्टरांच्या केवळ कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे नसून कोरोनासारख्या भीषण महामारीच्या काळामध्ये मनोबलावर विपरीत परिणाम करणारे आहे, परंतु सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणून भोळीभाबडी जनता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांचे आरोग्य बोगस डॉक्टरांच्या हातात देण्याची शक्यता नाकारता येत नाही” अशी भीती डॉ. दीपक मुंढे यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

“आपल्या व्यक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण होत आहे, याची जाणीव ठेवून लोकांमधील संभ्रम आणि गैरसमज दूर व्हावा, यासाठी संजय राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागो न मागो, परंतु सर्वसामान्य जनतेची तात्काळ माफी मागून त्यांच्या मनात पेरलेले गैरसमज तात्काळ दूर करावे” अशी मागणीही डॉ. दीपक मुंढे यांनी केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. माझी तशी भावनाही नव्हती. अपमान आणि कोटी यांच्यातील फरक जाणून घेतला पाहिजे. अशाप्रकारच्या कोट्या राजकारणात होतात, वकिलांवरही होतात. कोट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर कुणावरही होतात. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी झाली. खरंतर त्याचं कौतुक केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“भारतातील डॉक्टर एवढे अचाट आणि अफाट आहेत की त्यांनी आपला कंपाऊंडरसुद्धा तेवढा ताकदीचा निर्माण केलाय, जो डॉक्टरकीचं काम करु शकतो. खरंतर हा डॉक्टरांचा बहुमान आहे. डॉक्टरांनी आपले सहाय्यक, सहकारी यांना अत्यावश्यक समयी आपल्या बरोबरीने या कार्यासाठी उभं केलं. हे जगात कुठेच नाही, हे फक्त भारतात आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

(MARD asks Sanjay Raut to apologize on Doctor Compounder Statement)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.