AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

कमी किंमत आणि अधिक सुरक्षित कारला ग्राहक अधिक पसंती देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा कार्सची माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तसेच त्या कार सुरक्षितही असतील.

'या' आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार, किंमत 10 लाखांपेक्षा कमी
| Updated on: Dec 10, 2020 | 7:27 PM
Share

मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. तर काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात.

कमी किंमत आणि अधिक सुरक्षित कारला ग्राहक अधिक पसंती देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा कार्सची माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तसेच त्या कार सुरक्षितही असतील. (India’s safest cars under Rs 10 lakh: Tata Tiago, Tigor, Altroz, Nexon Mahindra XUV300 and more)

टाटा टिअ‍ॅगो (TATA Tiago)

टाटा टिअ‍ॅगो (TATA Tiago) ही एक सुरक्षित कार आहे. ग्लोबल एनसीएपीने (Global NCAP) यावर्षीच्या सुरुवातीला या कारची क्रॅश टेस्ट घेतली होती. त्यात ही कार उत्तीर्ण झाली होती. या कारला ग्लोबल एनसीएपीने 4-स्टार रेटिंग दिलं आहे. या कारमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स आहेत. या कारमध्ये 83hp / 110Nm एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. या कारची किंमत 4.7 लाख रुपये ते 6.74 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

टाटा टिगॉर (Tata Tigor)

ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये टाटा टिगॉरला 4-स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटा टिगॉर आणि टियागोमध्ये फार फरक नसले तरी टिगॉर ही आकाराने थोडी मोठी कार आहे. टिगॉरची किंमत 5.39 लाख रुपये ते 7.49 लाख रुपयांमध्ये आहे.

टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)

Tata Altroz ही एक मोठी हॅचबॅक कार आहे. क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. ग्राहकांना या कारमध्ये पेट्रोलसह डिझेल इंजिनाचा पर्यायही देण्यात आला आहे. या गाडीचं पेट्रोल इंजिन हे टियागो / टिगॉरसारखंच आहे. परंतु या कारमध्ये ग्राहकांना 5-स्पीड मॅनुअल देण्यात आलं आहे. Tata Altroz च्या वेगवेगळ्या व्हेरियंट्सची किंमत 5.44 लाख रुपये ते 9.09 लाख रुपयांपर्यंत आहे.

टाटा नेक्सॉन (Tata Nexon)

टाटाची ही छोटी क्रॉसओव्हर गाडी भारतातील पहिली अशी कार आहे. जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. नेक्सॉनला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटा मोटर्स कंपनी त्यांची प्रत्येक कार मजबूत कशी होईल, याकडे सर्वाधिक लक्ष देते. तसेच टाटाच्या टियागो आणि टिगॉरला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. नेक्सॉनची किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरु होते.

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza)

ही कार 2016 साली भारतात लाँच करण्यात आली होती. या गाडीला आतापर्यंत भारतीय ग्राहकांकडून चांगली पसंती मिळाली आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत या कारला 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तर या कारला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. विटारा ब्रेझा या कारची किंमत 7.34 लाख रुपयांपासू सुरु होते.

महिंद्रा XUV300 (Mahindra XUV300)

महिंद्रा XUV300 ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड इन इंडिया कार आहे. या कारला ग्बोबल NCAP ने 5 स्टार रेटिंग दिलं आहे. या कारला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. भारतात तयार करण्यात आलेली ही कार दमदार आहेच, तितकीच सुरक्षितही आहे. तसेच या कारमध्ये जबरदस्त फिचर्सही देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 7 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. 7.95 लाख रुपयांपासून या कारची किंमत सुरु होते.

संबंधित बातम्या

Crash Test : विटारा ब्रेझा, होंडा WR-V ते टोयोटा अर्बन क्रूजर, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

भारतीयांच्या मनात भरलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

(India’s safest cars under Rs 10 lakh: Tata Tiago, Tigor, Altroz, Nexon Mahindra XUV300 and more)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.