आधी राम लल्लाचं दर्शन मग भूमिपूजन, पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला अयोध्यत, सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

"पंतप्रधान मोदी 40 किलो चांदिची विट ठेवून मंदिराच्या बांधकामाला शुभारंभ करतील. ही विट साडेतीन फुटांची असेल. विटेवर नक्षत्रांचे चिन्ह असतील", अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिली (Invitation to all Chief Ministers for Ram Mandir Bhumi Pujan in Ayodhya).

आधी राम लल्लाचं दर्शन मग भूमिपूजन, पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला अयोध्यत, सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 7:23 PM

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिली. पंतप्रधान मोदी 5 ऑगस्ट रोजी सुरुवातीला हनुमानगढीचं दर्शन घेतील. त्यानंतर राम लल्लांचं दर्शन घेतील. राम लल्लांच्या दर्शनानंतर नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करतील, असं स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितलं (Invitation to all Chief Ministers for Ram Mandir Bhumi Pujan in Ayodhya).

“राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं जाईल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं फक्त 150 व्यक्तींना निमंत्रण दिलं जाईल. याव्यतिरिक्त आणखी 50 व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होतील. सोशल डिस्टन्सिंगचा विचार करुन निमंत्रित मान्यवरांमध्ये अंतर राहील. याशिवाय कार्यक्रमाला 200 पेक्षा जास्त जण उपस्थित राहणार नाहीत”, असं स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितलं (Invitation to all Chief Ministers for Ram Mandir Bhumi Pujan in Ayodhya).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम 3 ऑगस्टपासूनच सुरु होईल. या कार्यक्रमासाठी काशीच्या विद्वान पंडितांना निमंत्रण दिलं जाईल. कोरोना संकट पाहता मर्यादित लोकांनाच कार्यक्रमात सहभागी केलं जाईल”, असं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनी सांगितलं.

“पंतप्रधान मोदी 40 किलो चांदिची विट ठेवून मंदिराच्या बांधकामाला शुभारंभ करतील. ही विट साडेतीन फुटांची असेल. विटेवर नक्षत्रांचे चिन्ह असतील”, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिली.

दरम्यान, राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आयोध्या सजवली जाणार आहे. कार्यक्रमाला राम जन्मभूमी आंदोलनाशी संबंधित लोकांना निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासोबतच अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

“पंतप्रधान कार्यालयाला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे औपचारिक निमंत्रण पाठवण्यात आलं आहे”, असं ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले. दरम्यान, “प्रस्तावित मंदिरात संग्रहालयदेखील असणार आहे. यामध्ये भाविक राम जन्मभूमीतून मिळालेल्या पुरातत्वीय कलाकृती बघू शकतील”, असं अनिल मिश्रा यांनी सांगितलं.

संबंधित बातमी :

राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन

पाच घुमट आणि 161 फूट उंचीचा प्रस्ताव, अयोध्येच्या भव्य राम मंदिराच्या भूमीपूजनाचं पंतप्रधानांना निमंत्रण

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.