Iran Israel Conflict : अखेर 12 दिवसांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी; ट्रॅम्प यांनी केलं ट्विट
Iran Israel Ceasefire : इराण आणि इस्रायलमध्ये अखेर युद्ध विरामाची अधिकृत घोषणा इराणकडून करण्यात आली आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये अखेर युद्ध विरामाची घोषणा करण्यात आली आहे. युद्ध विराम झाल्याची अधिकृत घोषणा देखील इराणकडून करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली आहे. युद्ध विरामाचं आता उल्लंघन करू नका असं ट्विट डोनाल्ड ट्रॅम्प यांनी केलं आहे. ट्रम्प यांनी या १२ दिवसांच्या संघर्षाला “बारा दिवसांचे युद्ध” असे संबोधले आणि इराण आणि इस्रायल दोघांच्याही “लवचिकता, धैर्य आणि बुद्धिमत्तेचे” कौतुक केले.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू होतं. इराण आणि इस्रायलने एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात दोन्ही देशांचं मोठं नुकसान देखील झालं. दरम्यान या युद्धात अमेरिकेने देखील उडी घेत इराणच्या 3 अणुकेंद्रांवर अमेरिकेने हल्ले केले होते. मात्र आता हे युद्ध थांबवण्यात आलेलं असल्याचं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. त्यानंतर इराणने देखील याबद्दल अधिकृत घोषणा करत युद्धबंदी झाल्याचं म्हंटलं आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

