‘आमच्या अण्वस्त्र वैज्ञानिकाच्या हत्येमागे इस्त्राईलचा हात’, ‘मोसाद’वरील इराणच्या आरोपाने खळबळ

इराणचे (Iran) सर्वात शक्तिशाली सैन्य कमांडर जनरल कासिम सुलेमानी (Qassem Soleimani) यांच्या हत्येनंतर आता सर्वोच्च अण्वस्त्र वैज्ञानिक मोहसिन फाखरीजादेह (Mohsen Fakhrizadeh) यांची देखील हत्या झाली आहे.

'आमच्या अण्वस्त्र वैज्ञानिकाच्या हत्येमागे इस्त्राईलचा हात', 'मोसाद'वरील इराणच्या आरोपाने खळबळ
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Nov 28, 2020 | 11:16 PM

तेहरान : इराणचे (Iran) सर्वात शक्तिशाली सैन्य कमांडर जनरल कासिम सुलेमानी (Qassem Soleimani) यांच्या हत्येनंतर आता सर्वोच्च अण्वस्त्र वैज्ञानिक मोहसिन फाखरीजादेह (Mohsen Fakhrizadeh) यांची देखील हत्या झाली आहे. इराणने या हत्येमागे इस्त्राईलचा Israel) हात असल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे एका नव्या ‘युद्धाची’ सुरुवात होते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. इराणने या हत्येचा बदला घेणार असल्याचाही इशारा दिलाय. या हत्येत इस्त्राईलची गुप्तचर संस्था मोसादचा (Mossad) हात असून याची कल्पना अमेरिकेला (US) होती, असा दावा इराणने केलाय (Iran Top scientist Mohsen Fakhrizadeh killed Israel Mossad behind the assassination).

इराणने आपल्या महत्त्वाकांक्षी अण्वस्त्र कार्यक्रमावर वेगाने काम सुरु केलं होतं. त्यामुळेच इस्त्राईलसह अमेरिका हे दोन्ही देश यावर नाराज होते. इराणवर जागतिक पातळीवर अनेक निर्बंधही लादण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही इराणने वैज्ञानिक मोहसिन फाखरीजादेह यांच्या नेतृत्वात आपला अण्वस्त्र कार्यक्रम पुढे रेटला होता. मात्र, आता फाखरीजादेह यांचीच हत्या झाल्याने इराणकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचं प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने एक अमेरिकन अधिकारी आणि दोन इतर गुप्तचर अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येत इस्त्राईलचा हात असल्याचा दावा केलाय. असं असलं तरी अण्वस्त्र वैज्ञानिकाच्या हत्येबद्दल अमेरिकेला कल्पना होती की नाही याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, इस्त्राईल आणि अमेरिकेचे जवळचे संबंध पाहता अमेरिकेलाही या हत्येची कल्पना आधीच होती, असा अंदाज लावला जातोय.

तेहरानपासून (Tehran) पूर्वेला 70 किलोमीटर असलेल्या अबसार्द शहरात फाखरीजादेह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 4 हल्लेखोरांनी फाखरीजादेह यांच्यावर गोळीबार केला. घटनास्थळावर लोकांना गोळीबाराचा आवाज आला होता. हल्ल्यात जखमी फाखरीजादेह यांना वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांच्यावरील उपचार अपयशी ठरले आणि त्यांचा मृत्यू झाला. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या हत्येत इस्त्राईलचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केलाय.

फाखरीजादेह अनेक वर्षांपासून मोसादच्या रडारवर?

अण्वस्त्र संशोधक फाखरीजादेह इस्त्राईलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या (Mossad) हिटलिस्टवर होते. मागील एक दशकापूर्वी फाखरीजादेह यांच्या अनेक सहकारी संशोधकांचीही हत्या झाली होती. त्यातही मोसादचा हात होता, असं बोललं जातं. 2010 ते 2012 दरम्यान इराणच्या चार अण्वस्त्र शास्त्रज्ञांची हत्या झाली होती. मोसाद जगातील सर्वात धोकादायक गुप्तचर संस्थांपैकी एक आहे. आपल्या शत्रूंचा बंदोबस्त करण्यात मोसादचं नाव आहे. अगदी अनेक वर्षे पाळत ठेऊन जगातील कोणत्याही कोपऱ्यात आपल्या टारगेटला संपवण्याच्या मोसादच्या अनेक कहाण्या आहेत.

संबंधित बातम्या :

इराणमध्ये मोसादकडून अलकायदाच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा, लादेनच्या सुनेचाही मृत्यू

चीनच्या प्रभावात असलेला इराण भारताला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

इराणच्या इशाऱ्याने विध्वंसक युद्धाची शक्यता, आर्मेनिया आणि अजरबैजान देशांमध्ये हजारो निष्पापांचे बळी

Iran Top scientist Mohsen Fakhrizadeh killed Israel Mossad behind the assassination

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें