AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेतील जेवण महागणार, चहा 140 रुपयांवर

राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये चहा, नाश्ता आणि जेवण महागणार आहे

रेल्वेतील जेवण महागणार, चहा 140 रुपयांवर
| Updated on: Nov 15, 2019 | 12:24 PM
Share

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणे आता महागणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान चहा, नाश्ता आणि जेवणावर आता प्रवाशांना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत (Central Railway New Catering Rates). रेल्वे बोर्डाच्या अन्न व पेय विभागाच्या संचालकांकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये चहा, नाश्ता आणि जेवण महागणार आहे (Tea, Breakfast and Meal Charges). इतकंच नाही, तर या गाड्यांचे तिकीट घेतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचेही पैसे भरावे लागणार आहेत. त्याशिवाय, इतर गाड्यांमधील प्रवाशांनाही महागाईचा फटका बसणार आहे (IRCTC Catering Charges).

राजधानी, दुरांतो आणि शताब्दी या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, सेकंड एसीच्या प्रवाशांना चहासाठी आता 10 रुपयांच्या जागी 20 रुपये द्यावे लागतील, तर स्लीपर क्लासच्या प्रवाशांना 15 रुपये द्यावे लागतील. दुरांतोच्या स्लीपर क्लासमध्ये नाश्ता किंवा जेवणासाठी सध्या 80 रुपये द्यावे लागतात. मात्र, नवे दर लागू झाल्यानंतर यासाठी 120 रुपये भरावे लागणार आहेत. तर सेकंड एसीच्या प्रवाशांना नाश्ता आणि जेवणासाठी 125 रुपेय नाही, तर 185 रुपये द्यावे लागतील. इतकंच नाही तर, सायंकाळच्या चहासाठी सेकंड क्लास एसीच्या प्रवाशांना 45 नाही, तर 90 रुपये द्यावे लागतील. तसेच, स्लीपर क्लासच्या प्रवाशांना सायंकाळच्या चहासाठी 20 रुपयांऐवजी 50 रुपये द्यावे लागतील.

राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस फर्स्ट एसी क्लास दर

सेवासध्याचे दर नवे दर
सकाळचा चहा1535
नाश्ता 90140
जेवण 145245
सायंकाळचा चहा 75140

राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस सेकंड आणि थर्ड एसी क्लास दर

सेवासध्याचे दर नवे दर
सकाळचा चहा1020
नाश्ता 75105
जेवण 125185
सायंकाळचा चहा4590

राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस स्लीपर क्लास दर

सेवा सध्याचे दर नवे दर
सकाळचा चहा1015
नाश्ता 4065
जेवण 80120
सायंकाळचा चहा 2050

इतर मेल/एक्स्प्रेचे दर

सेवा सध्याचे दर नवे दर
नाश्ता (व्हेज)3040
नाश्ता (नॉन-व्हेज)3550
जेवण (व्हेज)5080
जेवण (नॉन-व्हेज)5590

चार महिन्यांनंतर नवे दर लागू होणार

तिकीट सिस्टिममध्ये नवे पदार्थ आणि दर येत्या 15 दिवसांमध्ये अपडेट होतील. तर 120 दिवसांनंतर म्हणजेच चार महिन्यांनंतर हे नवे दर लागू करण्यात येतील.

या नव्या दरांमुळे फक्त प्रिमिअम गाड्यांतील प्रवाशांनाच नाही, तर इतर मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवाशांच्या खिशालाही फटका बसणार आहे. नेहमीच्या मेल गाड्या आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये शाकाहारी जेवण 80 रुपयांना मिळेल, जे आज 50 रुपयांमध्ये मिळतं. रेल्वेकडून प्रवाशांना अंडा बिर्याणी 90 रुपयाला, तर चिकन बिर्याणी 110 रुपयांमध्ये दिली जाईल. तसेच, 130 रुपयांना चिकन करी देखील उपलब्ध असेल.

2014 नंतर पहिल्यांदा दरवाढ

‘सकाळच्या चहाच्या तुलनेत सायंकाळच्या चहाची किंमत जास्त आहे. याचं कारण म्हणजे, सायंकाळच्या चहासोबत रोस्टेड नट्स, स्नॅक्स आणि मिठाई दिली जाईल. आम्ही रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसच्या गुणवत्तेत सुधार करायचा आहे. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

गेल्यावेळी 2014 मध्ये दरवाढ करण्यात आली होती. रेल्वे बॉर्डाच्या परिपत्रकानुसार, आयआरसीटीसीची विनंती आणि बॉर्डाच्या मेन्यू अँड टॅरिफ कमिटीच्या शिफारसीनंतर हे दर वाढवण्यात आले आहेत.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...