विद्या बालन प्रेग्नेंट असल्याची चर्चा, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

विद्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडीओनंतर विद्या बालन गर्भवती असल्याची चर्चा सुरु झाली.

विद्या बालन प्रेग्नेंट असल्याची चर्चा, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या आगामी सिनेमा ‘मिशन मंगल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान विद्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडीओनंतर विद्या बालन गर्भवती असल्याची चर्चा सुरु झाली.

विद्या बालनचा वांद्रे येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये विद्याने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, त्यासोबत तिने डेनिम जॅकेट पेअर केलं आहे. या व्हिडीओला पाहून अनेकजण विद्या गर्भवती असल्याचा अंदाज लावत आहेत.

 

View this post on Instagram

 

#vidyabalan snapped at sequel in bandra today #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या व्हिडीओवर विद्याचे चाहते अनेक कमेंटही करत आहेत. ‘विद्या प्रेग्नेंट आहे का?’, असं एका चाहत्याने लिहिलं. तर कुणी, ‘बेबी कपूरसाठी आता आणखी वाट पाहू शकत नाही’, असं लिहिलं. आता विद्या कुठली गूड न्यूज देणार आहे की नाही, हे तर तिच सांगू शकते.

विद्या बालनने 2012 मध्ये सिनेमा निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी लग्न केलं. या दोघांचं नातं इतर जोडप्यांना ‘कपल रिलेशनशिप गोल्स’ देतं.

यापूर्वीही अनेकदा कुठल्या अभिनेत्रीच्या फोटो किंवा व्हिडीओवरुन ती गर्भवती असल्याचा अंदाज लावला गेला आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा गर्भवती असल्याच्या बातम्या फिरत होत्या. तर अभिनेत्री दीपिका पादूकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूरही गर्भवती असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण या सर्व बातम्या खोट्या ठरल्या. या अभिनेत्रींनी स्वत: या सर्व निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, विद्या बालन ही प्रसिद्ध दक्षिणात्य सुपरस्टार आणि नेते एनटीआर यांच्या बायोपिकमध्ये दिसली होती. त्याशिवाय, विद्या आगामी ‘मिशन मंगल’ या सिनेमात एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, अभिनेता शर्मन जोशी इत्याही कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

संबधित बातम्या :

‘सिंघम’फेम काजल अग्रवालच्या भेटीचं आमिष, चाहत्याला 60 लाखांचा गंडा

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाचा घटस्फोट

करण जोहरच्या पार्टीत ड्रग्स वापरल्याचा आरोप, मिलिंद देवरा म्हणतात…

…म्हणून सुबोध भावे यानंतर नाटकात काम करणार नाही!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI