इराणमध्ये मोसादकडून अलकायदाच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा, लादेनच्या सुनेचाही मृत्यू

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Nov 14, 2020 | 9:37 PM

इस्त्राईलने अलकायदाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू मोहम्मद मसरी उर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला याचा खात्मा केला आहे.

इराणमध्ये मोसादकडून अलकायदाच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा, लादेनच्या सुनेचाही मृत्यू
Follow us

तेहरान : इस्त्राईलने अलकायदाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू मोहम्मद मसरी उर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला याचा खात्मा केला आहे. 58 वर्षांचा अब्दुल्ला इराणमध्ये रहात होता. अब्दुल्लावर 22 वर्षांपूर्वी 1998 मध्ये आफ्रिकेत अमेरिकेच्या दोन दुतावासांवर बॉम्ब हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंडला मदत केल्याचा आरोप होता (Israel Al Qaeda terrorist Abdullah Ahmed Abdullah killed Iran Tehran).

स्पुतनिक या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अब्दुल्लाला इस्त्राईलची गुप्तचर संस्था मोसादच्या गुप्त टीमने ठार केलं. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या आदेशानंतर इस्त्राईलच्या गुप्तचर संस्थेने इराणमध्ये जाऊन अब्दुल्लाचा खात्मा केला. इराणची राजधानी तेहरानमध्ये अब्दुल्लासोबत त्याची मुलगी आणि ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनची विधवा पत्नीचाही मृत्यू झाला.

असं असलं तरी अब्दुल्लाला मारण्याच्या या मोहिमेत अमेरिकेची काय भूमिका होती याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, मागील मोठ्या काळापासून अमेरिकेची अब्दुल्लावर नजर असल्याचं सांगितलं जातं. अब्दुल्लाचं नाव एफबीआयच्या 170 मोस्ट वान्टेड दहशतवाद्यांच्या यादीत 7 व्या क्रमांकावर होतं. अब्दुल्ला 2015 मध्ये तेहरानच्या पसदरान जिल्ह्यात राहत होता.

11 सप्टेंबर 2001 मध्ये पेंटागनवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने 2011 मध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आदेशानुसार सीआयए, एसएडी आणि एसओजी या संस्थांनी संयुक्त मोहिमेंतर्गत ही कारवाई केली होती.

संबंधित बातम्या :

Jammu and Kashmir | कुपवाड्यात जवान आणि दहशतवादी आमनेसामने, तिघांना कंठस्नान, पण एक अधिकारी आणि तीन जवान शहीद

सीमेवर 250-300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, भारतीय जवान डाव उधळणार : आर्मी कोअर कमांडर

जम्मू-काश्मीरमधल्या पंपोरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन CRPF जवान शहीद, तिघे जखमी

व्हिडीओ पाहा :

Israel Al Qaeda terrorist Abdullah Ahmed Abdullah killed Iran Tehran

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI