समृद्धी महामार्गालगत 70 फूट खड्ड्यात शेतकरी पडला, शोधकार्य सुरु

एक शेतकरी समृद्धी महामार्गासाठी केलेल्या खड्ड्यात पडून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. (Jalna Farmer fall in Samruddhi Highway Potholes)

समृद्धी महामार्गालगत 70 फूट खड्ड्यात शेतकरी पडला, शोधकार्य सुरु
Namrata Patil

|

Oct 04, 2020 | 11:25 AM

जालना : शेतात जाण्यास निघालेला एक शेतकरी समृद्धी महामार्गालगतच्या खड्ड्यात पडून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला शिवारात ही घटना घडली आहे. पांडुरंग मुंढे (38) असे बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या त्यांचा शोध सुरु आहे. (Jalna Farmer fall in Samruddhi Highway Potholes)

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग मुंढे हे काल दुपारच्या सुमारास शेतात कामासाठी निघाले होते. त्यादरम्यान समृद्धी महामार्गालगत केलेल्या 70 फूट खोल असलेल्या खड्ड्यात ते पडले. त्यांचा काल दुपारपासून शोध सुरु आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने काल रात्रीपर्यंत त्यांचा शोध सुरु होता. मात्र अद्याप त्यांची काहीही माहिती मिळालेली नाही.

सध्या घटनास्थळी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे, शेख इब्राहिम हे उपस्थितीत आहे. तसेच अद्यापही अग्निशमन दलाकडून त्या शेतकऱ्याचा शोध सुरु आहे. मात्र अद्याप त्याचा काही थांगपत्ता लागलेला नाही.  (Jalna Farmer fall in Samruddhi Highway Potholes)

संबंधित बातम्या : 

मी स्वत: हून माझे जीवन संपवतोय, डोंबिवलीतील पतपेढीच्या मॅनेजरचा कार्यालयातच गळफास

साताऱ्यातील दहा महिन्यांच्या बाळाच्या अपहरण-हत्येचे गूढ उकलले

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें