Rekha Jare Murder | वादातून नाही, तर सुपारी देऊन हत्या, नगरच्या रेखा जरे हत्याकांडात पत्रकाराच्या समावेशाने खळबळ

प्रवासादरम्यान किरकोळ वाद झाल्याचं दाखवत हत्या करण्यात आलेल्या रेखा जरे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

Rekha Jare Murder | वादातून नाही, तर सुपारी देऊन हत्या, नगरच्या रेखा जरे हत्याकांडात पत्रकाराच्या समावेशाने खळबळ
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 7:25 PM

अहमदनगर : प्रवासादरम्यान किरकोळ वाद झाल्याचं दाखवत हत्या करण्यात आलेल्या रेखा जरे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या हत्यांकांडामागील मुख्य सूत्रधार पत्रकार असून त्याने सुपारी देऊन हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अहमदनगरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. रेखा जरे हत्यांकाडांतील पत्रकाराचं नाव बाळासाहेब बोठे असं आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या तपासातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील कारवाईचे तपशीलही दिले (Journalist Balasaheb Bothe gives Murder Betel nut of Rekha Jare Ahmednagar Police say in PC).

आरोपी बाळासाहेब बोठे याने रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. पोलिसांनी आरोपींकडून हत्येच्या सुपारीसाठी दिलेले 6 लाख रुपये जप्त केले आहेत. असं असलं तरी अद्यापही या हत्येमागील कारण स्पष्ट झालेलं नाही. मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आलेला आरोपी बाळासाहेब बोठे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला अटक झाल्यानंतरच या हत्येमागील कारण समजू शकणार आहे.

आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. आरोपी बोठेला पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान याआधी या प्रकरणात फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे आणि आदित्य चोळके या तिघांना अटक करण्यात आली होती.

अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, “रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणात सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. यानंतर सुपा पोलीस आणि एमसीबीने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अगरवाल, डीवायएसपी अजित पाटील यांच्या नेतृत्वात तपास करण्यात आला. या पठकाने 2 डिसेंबरपर्यंत 3 आरोपींना अटक केली होती. या 3 आरोपींच्या चौकशीत या हत्येत आणखी आरोपींचा समावेश असल्याचं समोर आलं.”

“आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईत आणखी दोघांना अटक करण्यात आली. सागर भिंगारदिवे आणि ऋषीकेश पवार अशी या आरोपींची नावे आहेत. या 5 आरोपींचा अधिक तपास केला असता या आरोपींना सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं. बाळासाहेब बोठे यांनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी देऊन त्यांच्या करवे हत्या केली आहे, असं आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालंय,” असं मनोज पाटील यांनी सांगितलं.

“आतापर्यंत या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी एक नाव निष्पन्न झालंय. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी अजित पाटील करत आहेत. या प्रकरणी अजून बरंच तपास काम करणं बाकी आहे. मात्र, या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना अटक करण्यात आलं आहे. याशिवाय देखील इतर कुणी या गुन्ह्यात सहभागी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असंही पोलीस अधीक्षक पाटील यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

Journalist Balasaheb Bothe gives Murder Betel nut of Rekha Jare Ahmednagar Police say in PC

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.