AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यायधीशच तिच्या सौंदर्यावर भाळले; तिची एक झलक पाहाण्यासाठी कोर्टने चक्क बॉलिवूड अभिनेत्रीला नोटीस पाठवली

एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्यावर न्यायधीशच इतके भाळले होते की तिचा काहीही गुन्हा नसताना तिची एक झलक पाहण्यासाठी कोर्टने चक्क बॉलिवूड अभिनेत्रीला नोटीस पाठवली आणि तिला कोर्टात हजर राहण्यास सांगितले.

न्यायधीशच तिच्या सौंदर्यावर भाळले; तिची एक झलक पाहाण्यासाठी कोर्टने चक्क बॉलिवूड अभिनेत्रीला नोटीस पाठवली
Updated on: Jan 28, 2025 | 3:53 PM
Share

सेलिब्रिटींची कितीतरी प्रकारचे फॅन आपल्याला पाहायला मिळतात. सेलिब्रिटींनी त्यांना आलेले विचित्र अनुभव कित्येकदा शेअरही केले आहे. पण एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या बाबतीत फारच विचित्र प्रकार घडला. या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर भाळणाऱ्या चाहत्यांमध्ये एक न्यायाधीशही होते. ते या अभिनेत्रीचे एवढे जबरदस्त फॅन होते की त्यांनी थेट तिला कोर्टात हजर होण्यासाठी नोटीस पाठवली.

 तिचं सौंदर्यचं तिचा गुन्हा ठरला 

बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांच्या चाहत्यांचे अनेक अनुभव येतात. पण या अभिनेत्रीसारखा अनुभव हा क्वचितच कोणाला आला असेल. काहीही गैरकृत्य केलेलं नसताना तिचं सौंदर्यचं तिचा गुन्हा ठरला आणि कोर्टाने थेट तिला समन्स पाठवलं.

बरं ही अभिनेत्री खरोखरच इतकी सुंदर की आजही कित्येकजण तिच्या प्रेमात वेडे आहेत. त्याच चाहत्यांमध्ये हे न्यायाधीशही होते. ही अभिनेत्री आहे श्रीदेवी. होय श्रीदेवी यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांना चक्क कोर्टात बोलावलं होतं. त्यासाठी श्रीदेवीला कोर्टाकडून समन्स पाठवण्यात आलं होतं.

श्रीदेवींची एक झलक पाहण्यासाठी न्यायाधीशांनी कोर्टाकडून चक्क समन्स पाठवला

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना माजीद मेमन यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी संबंधित हा मनोरंजक किस्सा सांगितला. केवळ न्यायाधीशांना तिला बघायचे होते म्हणून त्यांनी श्रीदेवी यांना कोर्टात बोलावले होते. माजिद यांनी म्हटलं आहे, “मी एका प्रकरणात श्रीदेवीचे प्रतिनिधित्व करत होतो. त्यावेळी ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले होते. न्यायदंडाधिकारीसुद्धा त्याला पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. मी सूट मिळण्यासाठी अर्ज केला, पण तो मंजूर झाला नाही. न्यायाधीशांनी त्यांच्या उपस्थितीचा आग्रह धरला. ती कोर्टात पोहोचल्यावर जमाव नियंत्रणाबाहेर गेला.” श्रीदेवी यांना पाहण्यासाठी कोर्टात चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी अखेर नियंत्रणाबाहेर गेली होती असंही त्यांनी सांगितलं.

कोण आहेत वकील माजिद?

ज्येष्ठ वकील माजिद यांचे बॉलीवूडशी घट्ट नाते आहे. त्यांचे बॉलिवूडशी जवळचे नाते आहे. महेश भट्ट हे त्यांचे जवळचे मित्र आहेत. कॉलेजच्या दिवसांपासून ते अनेक सेलिब्रिटींच्या संपर्कात होते. माजिद म्हणाले, ‘मी अनेकदा दिलीप कुमार आणि सुनील दत्त यांसारख्या दिग्गजांना नौशाद साहबच्या घरी भेटत असे, जिथे आम्ही रोज भेटायचो.’ वकील झाल्यानंतरही त्यांचा बॉलिवूडशी संबंध कायम राहिल्याचंही त्यांनी म्हटलं.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.