कल्याणमध्ये कुख्यात गुंडाने पोलिसांवर कुत्रे सोडले, एक तासाच्या थरारानंतर गुंडाला अटक

फिरोज मेंटलवर गंभीर स्वरुपाचे 22 गुन्हे दाखल आहेत. असा कोणताही ही गुन्हा नाही जो त्याने केलेला नाही.

कल्याणमध्ये कुख्यात गुंडाने पोलिसांवर कुत्रे सोडले, एक तासाच्या थरारानंतर गुंडाला अटक
Nupur Chilkulwar

|

Oct 09, 2020 | 11:24 PM

कल्याण : कल्याणमध्ये कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडाने त्यांच्या घरातील (Kalyan Police Arrest Gangster Firoj Mental) दोन डॉबरमॅन कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरी देखील पोलिसांनी कुख्यात गुंड फिरोज मेंटलला शिताफीने अटक केली आहे (Kalyan Police Arrest Gangster Firoj Mental).

कल्याणच्या वालघूनी परिसरात कुख्यात गुंड फिरोज मेंटलची अनेक वर्षापासून दहशत आहे. फिरोज मेंटलवर गंभीर स्वरुपाचे 22 गुन्हे दाखल आहेत. असा कोणताही ही गुन्हा नाही जो त्याने केलेला नाही. हा जेवढा सराईत आहे. तेव्हढाच विचित्र डोक्याचाही आहे. तो कोणावरही हल्ला करतो. समोर पोलीस आहे की सामान्य माणूस त्याला काही फरक पडत नाही. त्याच्या या सटकू वृत्तीमुळेच त्याला फिरोज मेंटल हे नाव पडले आहे.

2018 साली ठाण्याला कल्याण न्यायालयात आणले असताना त्याने पोलिसांसोबत भांडण केले होते. हा जेलमध्ये होतो. जेलमधून बाहेर आल्यावर तो वॉन्टेड होता. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना माहिती मिळाली की, मेंटल त्याच्या वालधूनी येथील घरी आला आहे. पोलीस अधिकारी दीपक सरोदे, गणेश कुंभार यांचे पथक त्याला पकडण्यासाठी पोहचली. फिरोज मेंटलने पोलिसांच्या अंगावर दोन डॉबरमॅन कुत्रे सोडले.

कुत्रे आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरु होता. याचा फायदा घेत मेंटल हा पळून गेला. मात्र, कुत्र्यांना कसेबसे चकवीत अखेर पोलिसांनी फिरोज मेंटलला एका तासाभरात जेरबंद केले. फिरोज मेंटलपुढे त्याच्या मागे डॉबरमॅन कुत्रे आणि या कुत्र्यांच्या मागे पोलीस हा थरार एक तासभर चालला. एखाद्या चित्रपटात घडते तशी ही घटन घडली आहे.

कल्याणमध्ये कुख्यात गुंडाने पोलिसांवर कुत्रे सोडले, एक तासाच्या थरारानंतर गुंडाला अटक

Kalyan Police Arrest Gangster Firoj Mental

संबंधित बातम्या :

नाशकातून ISI एजंटला अटक, 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

कोरोनामुळे कैदी कारागृहाबाहेर, पोलीस असल्याचे भासवून लूट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें