लग्नास नकार दिल्यानं तरुणीला मारहाण, कल्याण पोलिसांनी प्रियकराला 2 तासात ठोकल्या बेड्या

लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीला मारहाण करणाऱ्या प्रियकराला कल्याण पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या. Kalyan Police arrested accuse within two hours in case of beating young girl

लग्नास नकार दिल्यानं तरुणीला मारहाण, कल्याण पोलिसांनी प्रियकराला 2 तासात ठोकल्या बेड्या

कल्याण : तुझ्यासाठी बायकोला सोडले आहे. तू आता लग्नाला का नकार देते?, असे म्हणत तरुणीला मारहाण करणाऱ्या युवकाला कल्याण पोलिसांनी दोन तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ही कारवाई केली. तरुणीला मारहाण करणाऱ्या प्रियकराचे नाव अजित कनोजिया असे आहे. (Kalyan Police arrested accuse within two hours in case of beating young girl)

कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात राहणारी एक तरुणी ही कल्याण पश्चिमेतील सर्योदय मॉलमध्ये कामाला आहे. ही तरुणी काम आटोपून मॉलच्या खाली अली असता एका तरुणाने तिच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर तिला भर रस्त्यात मारहाण सुरु केली. काही नागरीकांनी या तरुणाला पकडले. मात्र तो पळून गेला. तरुणीला मारहाण करणाऱ्या युवकाचे नाव अजित कनोजिया असून काही वर्षापासून त्याचे संबंधित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अजित हा विवाहित आहे. विवाहित असताना या तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. दहा दिवसापूर्वी त्याने या प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते. पत्नीला सोडल्यानंतर तो तरुणीला वारंवार लग्नासाठी गळ घालत होता. तरुणीने त्याला लग्नासाठी नकार दिला होता. शुक्रवारी सांयकाळी लग्नाच्या विषयावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिला मारहाण केली.

याप्रकरणी तरुणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर यांनी या प्रकरणाचा तपास दीपक सवरेदय यांना दिला. त्यांनी अवघ्या 2 तासाच आरोपीला अटक केली.

संबंधित बातम्या :

नाशिक पोलीस आयुक्तांचा नवा उपक्रम, गुन्हेगारी रोखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये

Breaking | सुट्टीवर असतानाही सोनार पोलीस दाम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी

(Kalyan Police arrested accuse within two hours in case of beating young girl)

Published On - 3:30 pm, Sat, 17 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI