Shivaji Maharaj | बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे उभारणार

मनगुत्ती गावात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही तर एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे स्थापन होणार आहेत.

Shivaji Maharaj | बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे उभारणार

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला आहे (Mangutti Shivaji Maharaj Statue). आता मनगुत्ती गावात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही तर एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे उभारले जाणार आहेत. मनगुत्ती गाव प्रमुख शरद पाटील यांनी याबाबतची माहिती दिली (Mangutti Shivaji Maharaj Statue).

दरम्यान, बेळगाव सीमाभागासह संपूर्ण कर्नाटकचे आणि महाराष्ट्राचे लक्ष मनगुत्ती गावाकडे लागले होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मनगुत्ती आणि अन्य तीन गावच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल उपस्थित करण्यात आला (Mangutti Shivaji Maharaj Statue).

हे प्रकरण समोर येताच बेळगाव ते महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी कर्नाटक सरकारविरोधात आंदोलनं करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवभक्त आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर, मनगुत्ती गावातही याचे पडसाद उमटले. हे सर्व पाहता कर्नाटक सरकारने सावध भूमिका घेत आठ दिवसत शिवरायांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आता मनगुत्ती गावात फक्त शिवाजी महाराजच नाही, तर पाच महापुरुषांचे पुतळे स्थापन होणार आहेत. मनगुत्ती गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त होत आहे.

Mangutti Shivaji Maharaj Statue

संबंधित बातम्या :

शिवरायांचा पुतळा हटवणारा बोलवता धनी जगाने पाहिला, वर्तन बदला, खोतकरांचा भाजपला इशारा

Shivaji Maharaj | कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला बांगड्यांचा‌ हार, शिवभक्त आक्रमक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI