AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Johar | गोव्याच्या सौंदर्याचे नुकसान केल्याचा आरोप; करण जोहरच्या टीमवर कंगना रनौत संतापली

चित्रपट निर्माते करण जोहर यांची धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्या वादात आहे. गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याठिकाणी प्लास्टिकच्या काही प्लेट, चमचे आणि इतर प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या आहेत.

Karan Johar | गोव्याच्या सौंदर्याचे नुकसान केल्याचा आरोप; करण जोहरच्या टीमवर कंगना रनौत संतापली
| Updated on: Oct 28, 2020 | 1:39 PM
Share

मुंबई : चित्रपट निर्माते करण जोहर यांची धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्या वादात आहे. गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याठिकाणी प्लास्टिकच्या काही प्लेट, चमचे आणि इतर प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या आहेत. हे गाव गोव्याची राजधानी पणजीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे येथील रहिवाश्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. आता या वादात अभिनेत्री कंगना रनौतनेही उडी घेतली असून चित्रपटसृष्टीचा पर्यावरणाला धोका असल्याचे कंगना रनौतने म्हटले आहे. शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी काम करत आहेत.( Kangana Ranaut angered to Karan Johar’s team)

कंगना रनौतने ट्विटमध्ये म्हटले आहे की, चित्रपट उद्योग हा देशाच्या संस्कृती आणि नैतिकतेसाठी केवळ एक विषाणू नाही, तर आता हा उद्योग पर्यावरणासाठीही अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यानंतर कंगना पुढे म्हणते, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर कृपया या बड्या प्रोडक्शन हाऊसची बेजबाबदार वागणूक पहा आणि यावर कारवाई करा. कंगना आणखी एक ट्विट करत म्हणाली की, ‘ही असंवेदनशीलता आणि विसंगत वृत्ती अतिशय निराशाजनक आहे. फिल्म युनिट्समध्ये महिला सुरक्षा, आधुनिक पर्यावरणीय ठराव, चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि कामगारांना चांगले अन्न मिळावे, या संदर्भात कठोर नियमांची आवश्यकता आहे. या बाबींची तपासणी करण्यासाठी शासनाने एक स्वतंत्र विभाग निर्माण केला पाहिजे. गोव्यातील पर्यावरण संर्वधन कार्यकत्यांनी या घडलेल्या प्रकरणाबद्दल करण जोहरला माफी मागण्याचे आवाहन केले आहे. करण जोहरने या प्रकरणात माफी मागितली नाही, तर करण जोहरच्या मुंबई कार्यालयात हा कचरा पाठवण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. पर्यावरण संर्वधनमधील एक कार्यकर्ता म्हणतो की, हा कचरा जुहू, लोखंडवाला किंवा वर्सोवामध्ये अशा मोकळ्या जागी टाकण्याची हिंमत करू शकते का? जर असे झाले तर या वरून त्याठिकाणी किती मोठ्या प्रमाणात हंगामा होऊ शकतो. रस्त्यावर कचरा टाकणे हा गुन्हा आहे. आणि गोव्याच्या स्थानिक कायद्यांनुसार कुठेही कचरा टाकणे प्रतिबंधित आहे.

संबंधित बातम्या : 

Karan Johar | ड्रग्ज प्रकरणातून करण जोहरला ‘क्लीन चीट’, फॉरेन्सिक लॅबकडून ‘हा’ दावा!

करण जोहरच्या पार्टी व्हिडीओमुळे ड्रग्ज प्रकरणात खळबळ, बडे अभिनेते रडारवर

(Kangana Ranaut angered to Karan Johar’s team)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.