Manikarnika: मी पण राजपूत, बर्बाद करेन, कंगनाचा विरोधकांना इशारा

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) हा राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र करणी सेनेने दीपिका-रणवीरच्या पद्मावत सिनेमाप्रमाणे ‘मणिकर्णिका’ सिनेमावरही आक्षेप घेतला आहे. पण कंगना राणावतनेही राजपूत समाजाच्या करणी सेनेला जसास तसं उत्तर दिलं आहे. कंगना म्हणते, “मी सुद्धा राजपूत आहे. जर सिनेमा प्रदर्शनादरम्यान व्यत्यय आणला तर बर्बाद करेन” […]

Manikarnika: मी पण राजपूत, बर्बाद करेन, कंगनाचा विरोधकांना इशारा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) हा राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र करणी सेनेने दीपिका-रणवीरच्या पद्मावत सिनेमाप्रमाणे ‘मणिकर्णिका’ सिनेमावरही आक्षेप घेतला आहे. पण कंगना राणावतनेही राजपूत समाजाच्या करणी सेनेला जसास तसं उत्तर दिलं आहे. कंगना म्हणते, “मी सुद्धा राजपूत आहे. जर सिनेमा प्रदर्शनादरम्यान व्यत्यय आणला तर बर्बाद करेन”

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (Manikarnika: The Queen Of Jhansi) हा सिनेमा पुढील शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रिलीज करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेतली आहे. त्यामुळे कोणीही रोखू शकत नाही, असं कंगनाने सुनावलं.

“चार इतिहासकारांनी ‘मणिकर्णिका’ला प्रमाणपत्र दिलं आहे. शिवाय सेन्सॉर बोर्डानेही हिरवा कंदील दाखवला आहे. तरीही करणी सेनावाले त्रास देत आहेत. जर त्यांनी हे बंद केलं नाही, तर त्यांना माहित नाही की मी सुद्धा राजपूत आहे. मी सर्वांना बर्बाद करेन”, असा थेट इशारा कंगनाने दिला.

मै अपनी झांसी नही दूंगी म्हणत ईस्ट इंडिया कंपनीविरोधात थेट लढणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा सिनेमा आहे. कंगना राणावतने या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे.

करणी सेनेचा आक्षेप काय?

करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने ‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांना इशारा दिला आहे. या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन केल्यास किंवा ब्रिटीशांबद्दल प्रेम दाखवल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.

VIDEO : मैं अपनी झांसी नहीं दूँगी, कंगनाच्या ‘मणिकर्ण‍िका’चा दमदार ट्रेलर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.