KBC 12 : महाराष्ट्राच्या कन्येने 12 लाख जिंकले, वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी ‘हॉटसीट’वर बसलेल्या अस्मिताची कहाणी

लोकप्रसिद्ध टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या (KBC) 12 व्या पर्वात महाराष्ट्राची कन्या अस्मिता गोरे हिने 12 लाख रुपये जिंकले आहेत (KBC 12 Asmita Gore from Latur Maharashtra won 12 lakhs).

KBC 12 : महाराष्ट्राच्या कन्येने 12 लाख जिंकले, वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी ‘हॉटसीट’वर बसलेल्या अस्मिताची कहाणी

मुंबई : आई-वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्याची जिद्द मनाशी बाळगून ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (KBC) सहभागी झालेल्या लातूरच्या अस्मिता माधव गोरेने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले आहेत. त्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्याचे ऑपरेशन आणि बहीण-भावांचं शिक्षण पूर्ण करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे (KBC 12 Asmita Gore from Latur Maharashtra won 12 lakhs). अस्मिताच्या संघर्षमय प्रवासाने कोरोनावर मात करुन आलेले महानायक अमिताभ बच्चन देखील भावूक झालेले दिसले.

अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये अस्मिताला 25 लाख रुपयांचा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर अस्मिता देऊ शकली नाही. त्यामुळे तिने तेथेच खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. यासह ती 12 लाख 50 हजार रुपये घेऊन घरी परतणार आहे. या पैशातून वडिलांची शस्त्रक्रिया आणि भावा-बहिणींचं शिक्षण करण्याची तिची इच्छा आहे.

अमिताभ बच्चन यांनी विचारलेला 25 लाख रुपयांचा प्रश्न

1905 मध्ये बंगालच्या विभाजनाविरोधात नागरिकांमध्ये  एकता दाखवण्यासाठी यापैकी कोणता दिवस विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला होता?

A- दसरा B- रक्षाबंधन C- ईद D- ईस्टर संडे

या प्रश्नाचं उत्तर रक्षाबंधन होतं.

याआधी 6 ऑक्टोबरच्या भागात स्पर्धक सविता रेड्डी यांनी 12 लाख 60 हजार जिंकल्यानंतर खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ‘हॉटसीट’वर आलेल्या राजस्थानच्या रघुराम यांनी केवळ 6 लाख 40 हजार रुपयांवर हा खेळ थांबवला. या दोन स्पर्धकांनंतर या खुर्चीत लातूरची (latur) अस्मिता माधव गोरे विराजमान झाली होती. अस्मिताचा केबीसीपर्यंतचा प्रवास पाहून खुद्द अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यातही पाणी आले होते (Asmita Madhav Gore a girl from Latur on KBC 12 hotseat).

हॉटसीटवर विराजमान होणाऱ्या स्पर्धकाची ओळख एका एव्हीमधून करून दिली जाते. लातूरमध्ये (Latur) राहणारी अस्मिता माधव गोरे (Amita Gore), वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी या खुर्चीत विराजमान झाली आहे. तिचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. तिच्या या प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चन यांच्यासह, सेटवर उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी अस्मिताची धडपड

आपल्या बुद्धीची चुणूक दाखवत हॉटसीटवर विराजमान झालेली अस्मिता (Asmita Gore) केवळ 22 वर्षांची आहे. इतक्या लहान वयात ती आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत आहे. अस्मिताचे वडील अंध असून, आईदेखील एकाच डोळ्याने पाहू शकते. अस्मिताच्या प्रगतीबद्दल तिची आई, वडिलांना सगळ्या गोष्टी सांगते. जणू काही तिचे वडील आईच्या एका डोळ्यातूनच अस्मिताला पाहतात.

अस्मिताला विदेशात जाऊन तिच्या आई-वडिलांची दृष्टी परत यावी म्हणून शस्त्रक्रिया करायची आहे. आई-वडिलांना आपण कसे दिसतो, काय करतो हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावे, म्हणून अस्मिताची धडपड सुरू आहे. (Asmita Madhav Gore a girl from Latur on KBC 12 hotseat)

केबीसी मंचावर अस्मिताच्या वडिलांची हजेरी!

नेत्रहीन असलेले माधव गोरे कायमच लेकीलाच्या मागे भक्कम आधार बनून उभे राहिले आहेत. अस्मिताच्या केबीसी (KBC) प्रवासातही ते तिच्या सोबत आले होते. अस्मिताची जिद्द आणि तिच्या वडिलांचा पाठिंबा यासह केबीसीच्या खेळाला सुरुवात झाली. अमिताभ बच्चन यांनी अस्मिताला सलाम करत, शुभेच्छा दिल्या.

अस्मिताच्या प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली आणि काही प्रश्नानंतर वेळ संपल्याचा गजर वाजल्याने अस्मिताला खेळ थांबवावा लागला. परंतु, महाराष्ट्राच्या या लेकीची जिद्द अवघ्या देशभरासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

संबंधित बातम्या :

KBC 12 | वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी अस्मिता ‘हॉटसीट’वर विराजमान, लातूरच्या लेकीची प्रेरणादायी कहाणी!

kbc-12 asmita of maharashtra won 12 lakhs on kaun banega crore pati heart touching story of the daughter of a blind parent

Published On - 12:31 am, Thu, 8 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI