पठ्ठ्याने तब्बल 31 लाख मोजले, गाडीसाठी आवडता नंबर घेतला

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

तिरुवनंतपुरम : वेगवेगळ्या बाईक आणि गाडी खरेदी करण्याची काही लोकांना खूप आवड असते. तर कुणाला काही दुर्मिळ आणि जुन्या बाईक किंवा गाड्या खरेदी करण्याची आवड असते. यासोबतच गाड्यांचे विशेष नंबरही काहीजण खरेदी करतात. त्यासाठी पाहिजे ती किंमत मोजण्यास तयार असतात. भारतातही एका व्यक्तीने गाडीच्या नंबरसाठी तब्बल 31 लाख रुपये मोजले आहेत. केरळमधील तिरुवनंतरपुरम येथील एका […]

पठ्ठ्याने तब्बल 31 लाख मोजले, गाडीसाठी आवडता नंबर घेतला
Follow us

तिरुवनंतपुरम : वेगवेगळ्या बाईक आणि गाडी खरेदी करण्याची काही लोकांना खूप आवड असते. तर कुणाला काही दुर्मिळ आणि जुन्या बाईक किंवा गाड्या खरेदी करण्याची आवड असते. यासोबतच गाड्यांचे विशेष नंबरही काहीजण खरेदी करतात. त्यासाठी पाहिजे ती किंमत मोजण्यास तयार असतात. भारतातही एका व्यक्तीने गाडीच्या नंबरसाठी तब्बल 31 लाख रुपये मोजले आहेत. केरळमधील तिरुवनंतरपुरम येथील एका डिस्ट्रीब्यूटरने आपल्या Porsche 718 Boxster गाडीला विशेष नंबर प्लेट देण्यासाठी 31 लाख रुपये खर्च केले आहेत. या गाडीचा नंबर ‘KJ-01CK-1’ आहे.

भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा नंबर म्हणून याची नोंद घेतली जात आहे. हा नंबर विकण्यासाठी लिलाव ठेवण्यात आला होता. यावेळी तिरुवनंतरपुरम येथील के. के. एस. बाळगोपाळ यांनी हा नंबर खरेदी केला. यापूर्वी सर्वात महागडा नंबर खरेदी करण्याचा रेकॉर्ड हरियाणा येथील Mercedes Benz S Class च्या नावावर होता. या कारच्या नंबरसाठी 26 लाख रुपये मोजले होते.

KJ-01CK-1 चा लिलाव सोमवारी आरटीओतर्फे केरळच्या तिरुवनंतरपुरम जिल्ह्यात ठेवला होता. लिलावाची सुरुवात 500 रुपयांपासून झाली होती. बाळगोपाळ 30 लाख रुपयांसोबत बोली जिंकले आणि अर्ज करण्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागले.

2017 मध्ये बाळगोपाळने आपल्या Toyota Land Cruiser साठी 19 लाख रुपये खर्च केले होते. तेव्हा बाळगोपाळने KL-01CB-1 नंबर खरेदी केला होता. बाळगोपाळ हे देवी फार्मा कंपनीचे संचालक आहेत. बाळगोपाळ यांच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत.

लिलावा दरम्यान बाळगोपाळ यांना शाईन युसेफकडून मोठी टक्कर मिळत होती. मात्र शाईनने 25 लाख रुपयांनंतर बोली बंद केली. बाळगोपाळला फँसी नंबर प्लेटची आवड आहे आणि ते अशा नंबरसाठी वाटेल तेवढा खर्चही करतात.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI