पुणेकरांसाठी खुशखबर, धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलं

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Aug 08, 2020 | 10:33 AM

पुण्यातील शहराला आणि शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा जलसाठा वाढला (Dam full in Pune)आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर, धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलं
Follow us

पुणे : पुण्यातील शहराला आणि शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा जलसाठा वाढला (Dam full in Pune) आहे. धरण क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. खडकवासला धरण तब्बल 92.61 टक्के भरले आहे. खडकवासला धरण लवकरच शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे (Dam full in Pune).

खडकवासला धरणाची क्षमता 1.83 टीएमसी आहे. आज खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याची शक्यता आहे. पुण्यातील चारही धरणांमध्ये आतापर्यंत एकूण 16.89 टीएमसी म्हणजेच 57. 96 टक्के जलसाठा आहे. मात्र गेल्या वर्षाच्या शंभर टक्क्यांच्या तुलनेत यंदा जलसाठा कमी आहे.

पानशेत धरणामध्ये 63.90 टक्के जलसाठा, वरसगाव धरणात 53.40 टक्के, तर टेमघर धरणात 38.19 टक्के जलसाठा आहे.

राज्यातील धरणं 44.8 टक्के भरली

राज्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील सर्व धरणं मिळून एकूण 44.8 टक्के भरली आहेत. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडला आहे. जुलै महिन्यातही बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय. त्यामुळेच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यासोबतच धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या राज्यातील मोठी, मध्यम आणि लघु अशी सर्व धरणं मिळून 44.8 टक्के भरली आहेत. कोकण विभागातील धरणांमध्ये सध्या सर्वाधीक म्हणजे 58.9 टक्के पाणीसाठा आहे, तर त्यापाठोपाठ नागपूर विभागातील धरणं 52.82 टक्के भरली आहेत.

राज्यात कुठल्या विभागातील धरणं किती भरली

विभाग धरणातील पाणीसाठा

अमरावती 36.96 टक्के

कोकण 58.9 टक्के

नागपूर 52.82 टक्के

नाशिक 37.87 टक्के

पुणे 37.87 टक्के

औरंगाबाद 42.21 टक्के

संबंधित बातम्या : 

Maharashtra Rain | बळीराजा सुखावला, महाराष्ट्रात सरासरीच्या 97.7 टक्के पाऊस

Maharashtra Dam : जून, जुलैमधील पावसामुळे राज्यातील सर्व धरणं 44.8 टक्के भरली

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI