किम जोंगनं कोरोनाच्या भीतीनं चीनसोबतची मैत्री तोडली, चीनसोबतच्या व्यापारात मोठ्या प्रमाणावर घट

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंगनं कोरोना संसर्गाच्या भीतीने चीनसोबतचे व्यापारी संबंध संपुष्टात आणले आहेत. Kim Jong Un corona

किम जोंगनं कोरोनाच्या भीतीनं चीनसोबतची मैत्री तोडली, चीनसोबतच्या व्यापारात मोठ्या प्रमाणावर घट
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 5:04 PM

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग अणुबाँम्बच्या जोरावर जगाला धमकावत असतो. मात्र, किम जोंगला कोरोना विषाणू संसर्गाची भीती वाटत आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने किम जोंगनं चीनसोबतचे व्यापारी संबंध संपुष्टात आणले आहेत. कोरोनाला घाबरलेल्या किम जोंगच्या आदेशानं कस्टम विभागातील अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियातील संसद सदस्यानं गुप्तहेर संघटनेच्या हवाल्यानं केला आहे. (Kim Jong un cutts off North Korea business relations with China due to Corona)

चीनच्या कस्टम विभागाच्या प्रशासनाच्या माहितीनुसार चीनमधून उत्तर कोरियात ऑक्टोबरमध्ये फक्त 2 लाख 53 हजार डॉलर रकमेचे साहित्य निर्यात झाले आहे. सप्टेंबरच्या तुलनते ऑक्टोबरमधील निर्यातीच्या रकमेत 99 टक्के घट नोंदवली गेली आहे. चीनमधून निर्मिती होणाऱ्या मालाचा उत्तर कोरिया सर्वात मोठा आयातदार आहे. उत्तर कोरियाची सर्वाधिक आयात चीनमधून होते.

उत्तर कोरियाने 2016 आणि 2017 मध्ये अणू चाचणीचा कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी देखील उत्तर कोरिया चीनमधून 90 टक्के आयात करत होता. कस्टम विभागाची आकडेवारी पाहिली असता उत्तर कोरियानं चीनमधून आयात कमी केले असल्याचे स्पष्ट होते. (Kim Jong un cutts off North Korea business relations with China due to Corona)

कोरोनामुळं व्यापार घटला?

उत्तर कोरिया आणि चीन यांच्यातील व्यापार कमी होण्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, या सर्वांमध्ये कोरोना संसर्ग महत्वाचे कारण मानले जात आहे. किम जोंगने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना न पाळल्यामुळे दोघांची हत्या घडवून आणल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या एका संसद सदस्याने गुप्तहेर यंत्रणेच्या आधारे दिली आहे. यामध्ये एका कस्टम अधिकाऱ्याचा समावेश होता. कोरोनासंबंधी नियमांचे योग्य प्रकारे पालन करत नसल्याचा त्याच्यावर आरोप होता.

दरम्यान, उत्तर कोरियाच्या कोणत्याही सूत्रांनी दोन जणांची हत्या झाल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही. उत्तर कोरियाच्या चीनसोबतच्या व्यापारावर कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे.

संबंधित बातम्या : 

उत्‍तर कोरियाचा प्रमुख आणि जगप्रसिद्ध हुकुमशाह किम जोंग नागरिकांसमोर का रडला?

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग कोमात, सत्तेची सूत्रे बहिणीकडे, भावापेक्षा बहीण जास्त क्रूर

‘कोरोना’ला आळा घातल्याबद्दल अभिनंदन! किम जोंगचा जिनपिंग यांना व्यक्तीगत संदेश

(Kim Jong un cutts off North Korea business relations with China due to Corona)

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.