AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला

कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावर बांबवडे की एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला लागून असलेल्या चौकात अज्ञातांनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला.

कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला
| Updated on: Oct 12, 2020 | 7:15 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे इथल्या मुख्य चौकात मध्यरात्री अज्ञातांनी (Kolhapur Chhatrapati Shivaji Maharaj Statue)  शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. बेकायदेशीरपणे पुतळा बसवल्याचं लक्षात येताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवप्रेमींनी याला विरोध दर्शवल्याने याठिकाणी दिवसभर तणाव कायम होता. अखेर पोलिसांनी सायंकाळी बळाचा वापर करत शिवप्रेमींना आडवलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून हा पुतळा सन्मानाने काढून घेतला (Kolhapur Chhatrapati Shivaji Maharaj Statue).

कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावर बांबवडे की एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला लागून असलेल्या चौकात अज्ञातांनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. या प्रकारामुळे बांबवडेसह परिसरात खळबळ उडाली. पुतळा पाहण्यासाठी सकाळी शिवप्रेमींनी गर्दी केली. पोलीस आणि अन्य प्रशासनाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला शिवप्रेमींनी कडाडून विरोध केला.

शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिवसभर ठाण मांडलं होतं. त्यामुळे बाजारपेठेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात होता. प्रशासनाने दिवसभर या शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवप्रेमी पुतळा काढू नये, यावर ठाम होते. परवानगी घेतली नसली तरी आता परवानगी काढू, मात्र बसलेला पुतळा हटवू नका, अशी त्यांची मागणी होती (Kolhapur Chhatrapati Shivaji Maharaj Statue).

दिवसभर आवाहन करुनही शिवप्रेमी ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी सायंकाळी बळाचा वापर केला. या ठिकाणी असलेल्या माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. अखेर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं आणि पुतळा परिसर रिकामा केला. पुतळ्याच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेऊन पुतल्याला दुग्धाभिषेक केला आणि विधिवत पूजा केली. त्यानंतर हा पुतळा चारही बाजूनी बंदिस्त करत काढून घेण्याची प्रक्रिया सुरु केली. दरम्यान या सर्व प्रकारामुळे बांबवडे परिसरात दिवसभर तणाव अनुभवायला मिळाला (Kolhapur Chhatrapati Shivaji Maharaj Statue).

संबंधित बातम्या :

आग्र्यातील मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, योगी आदित्यनाथ यांची घोषणा

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.