Kolhapur Election Results 2026 LIVE : करवीर नगरीत आज होणार फैसला, प्रभाग 13 ते 15 मध्ये कोणाच्या गळ्यात विजयश्री घालणार माळ ?

Kolhapur Parbhani Municipal Corporation (PMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग 13 ते 15 यासाठी काल मतदान झालं. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होत असून निकालाचं चित्र स्पष्ट होईल.

Kolhapur Election Results 2026 LIVE : करवीर नगरीत आज होणार फैसला, प्रभाग 13 ते 15 मध्ये कोणाच्या गळ्यात विजयश्री घालणार माळ ?
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:16 AM

करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या या नगरीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून महानगरपालिकांच्या तयारीचा एकदम धुरळा उडाला आहे. जळ, स्थळी, काष्ठी, पाषाणी… सर्वत्र चर्चा ऐकू येत होती ती फक्त इलेक्शनचीच. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्व पक्षांनी जीवाचं रान केलं असून निवडणून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने जंग जंग पछाडलं आहे. प्रभाग क्रमांक 13 ते 15 पर्यंतही निवडणुकीचा जोश एकदम जोरात असून तिथेही सर्व उमेदवारांनी तयारीत कोणतीही कसूर ठेवलेली दिसील नाही. तिन्ही विभागात एकाहून एक सरस उमेदवार असून आता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, आणि पराभवाचं तोडं कोणाला पहावं लागतंय, ते चित्र आज स्पष्ट होणार आहे. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होत असून काही काळातच निकाल स्पष्ट होईल. मात्र या प्रभागातील स्थिती, त्याचा विस्तारही सविस्तर जाणून घेऊया.

प्रभाग 13 –

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण 28 हजार 571 मतदार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीचे 5246 अनुसूचित जमातीचे 104 मतदार आहेत. या मतदारसंघाची व्याप्ती पद्माळा परिसर ते मंडलिक वसाहत परिसर इथपर्यंत आहे. उत्तरेला प्रॅक्टीस क्लब चौक पासून ते शाहुनगर रोडवरील जे जे डेंसिटी अपार्टमेंट पर्यंत हा प्रभाग जातो. तर पूर्वेला जे जे डेंसिटी अपार्टमेंट पासून टर्फ हॉकी ग्राऊंड जवळ हा प्रभाग आहे. दक्षिणेला आयसोलेशन रुग्णालय ते जयंती नाला पुलापर्यंत जातो. पश्चिमेस या प्रभागाची सुरूवात जयंती नाला पुलापासून ते प्रॅक्टीस क्लब चौकापर्यंत हा मतदारसंघ आहे.

यंदा मतदारसंघ बराच मोठा झाला असून मतदारांची संख्या 28 हजारांपर्यंत पोहोचली आहे. आता त्यांना 4 नगरेसवक निवडून द्यावे लागणार आहेत. आज या प्रभागाच निकाल असून विजयी गुलाल कोण उधळणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

प्रभाग 14-

कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये 26 हजार 412 मतदारांचा समावेश असून त्यामध्ये अनुसूचित जातीचे 2049 तर अनुसूचित जमातीचे 187 मतदार असल्याची माहिती समोर आली आहे. नागाळा पार्क परिसर ते शाहु मिल परिसरापर्यंत हा प्रभाग पसरला असून उत्तरेस खानविलकर पेट्रोल पंपपासून सुरू होणारा हा मतदार संघ रेल्वे लाइपर्यंत संपतो. तर पूर्वेस रेल्वे फाटकापासन सुरू होऊन हा भाग शाहु नगर मुख्य रस्त्यापर्यंत हद्द असते. दक्षिणेस कन्हैय्या सर्व्हिसिंग सेंटरपासून मिरजकर अपार्टमेंटपर्यंत हद्द असून पश्चिमेला मिरजकर तिकटी नागाळा पार्क एम.एस.इ.बी सब स्टेशपर्यंत हा प्रभाग आहे. या वेळी या प्रभागातून मतदार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतात आणि महापालिकेत पाठवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रभाग 15 –

कोल्हापूर शहराचा महत्वाचा भाग असलेला प्रभाग क्रमांक 15 सर्वांनाच परिचित आहे. साईक्स एक्सटेंशन ते राजारामपुरी पासून पसरलेला हा प्रभाग जामसांडेकर माळ झोपडपट्टी पर्यंत पसरलेला आहे. या प्रभागात एकूण मतदारसंख्या 27 हजार 137 इतकी असन अनुसूचित जातीचे 4873 मतदार तर अनुसूचित जमातीचे 75 मतदार आहेत.

उत्तरेस शाहुपूरी रेल्वे फाटक ते रेल्वे लाइनने पूर्वेकडे उड्डाणपुलापर्यंत मतदारसंघ असून पूर्वेस उड्डाणपुलापासून टेंबलाईवाडी टेलिफोन टॉवरपर्यंत या प्रभागाची व्याप्ती आहे. दक्षिणेस टेलिफोन टॉवरपासून ते राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीपर्यंत हा भाग असून पश्चिमेला शिवाजी विद्यापीठ शाहुपूरी रेल्वे फाटकपर्यंत हा प्रभाग आहे.

यावेळी या प्रभागातूनही चार नगरसेवक निवडून द्यायचे असून कोणत्या पक्षातील कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयश्री माळ घालते आणि कोणाला पराभवाचा स्वीकार करावा लागतो, हे तर थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

कोल्हापूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE