कोल्हापुरात प्रलय, राणादा छत्री धरुन, पाठक बाई गुडघाभर पाण्यात!

हार्दिक जोशी अर्थात राणादा आणि अक्षया देवधर अर्थात पाटक बाई, धनश्री काडगावकर अर्थात नंदीता वहिनी या सर्व कलाकारांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली.

कोल्हापुरात प्रलय, राणादा छत्री धरुन, पाठक बाई गुडघाभर पाण्यात!


(Kolhapur Flood) कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापुराचा फटका टीव्ही मालिकेतील कलाकारांनाही बसला. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं शूटिंग कोल्हापुरात सुरु आहे. मात्र कोल्हापुरात प्रचंड पूर आल्यामुळे या मालिकेतील कलाकारांना पुराचा फटका बसला.

या मालिकेतील कलाकार जिथे राहतात, त्या इमारतीत पाणी घुसलं. त्यामुळे हार्दिक जोशी अर्थात राणादा आणि अक्षया देवधर अर्थात पाटक बाई, धनश्री काडगावकर अर्थात नंदीता वहिनी या सर्व कलाकारांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली.

मालिकेतील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर गुडघाभर पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी पोहोचले.

कोल्हापूर आणि सांगली परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने एक दिवसही उघडीप दिली नाही. त्यामुळे नदी-नाले, धरणं तुडुंब झाली आहेत. आधीच पात्रं सोडलेल्या नद्यांमध्ये धरणातील पाणी सोडल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. नागरिकांच्या घरांमध्ये कधीच शिरलेलं पाणी आता घरंही बुडवत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर दाखल झालं आहे. अद्यापही कोल्हापूर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नागरी वस्त्यांमध्ये छातीपर्यंत लागेल इतकं पाणी आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI