Video : तुम्ही कधी हेल्मेट घातलेला रेडा बघितला आहे का? नसेल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा

Video : तुम्ही कधी हेल्मेट घातलेला रेडा बघितला आहे का? नसेल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा

कोल्हापुरातला हा रेडा पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल. कारण हा रेडिमेड हेल्मेट घालून आला आहे. म्हणून जे आजवर माणसांना जमलं नाही ये रेड्याने जमवल्याचं दिसतंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 14, 2021 | 9:11 PM

कोल्हापूर : माणसांना कितीही हेल्मेट घाला म्हटले तरी लोक काही केल्या नियमांचं पालन करत नाहीत, पुणेकरांना तर हेल्मेटचं खूपच वावगे, मात्र कोल्हापुरातला हा रेडा पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल. कारण हा रेडिमेड हेल्मेट घालून आला आहे. म्हणून जे आजवर माणसांना जमलं नाही ये रेड्याने जमवल्याचं दिसतंय.

गडहिंग्लजमध्ये हेल्मेटसारखे डोकं असणारा रेडा

दुचाकी चालवता हेल्मेटसक्ती आहे, मात्र हेल्मेटचा वापर फारसा दिसत नाही, पण तुम्ही कधी हॅम्लेट घातलेला रेडा बघितला नसेल, मात्र या रेड्याचे डोकं बघा आणि काय ते तुमचं तुम्ही ठरवा. कोल्हापूरच्या गडहिंग्लज याठिकाणी अर्जुन समूहाकडून सूंदर म्हैस आणि सुंदर रेडा स्पर्धा भरवल्या. या स्पर्धेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं हेल्मेट भोला या रेड्याने. या रेड्याच्या डोक्याची ठेवण हेल्मेट सारखी आहे. जणू या रेड्याने हेल्मेट घातले आहे की काय असा भास होतो. जाफराबादी गीर जातीचा हा रेडा असून अवघ्या दोन वर्षांचा आहे. गडहिंग्लज मधील या जनावरांच्या स्पर्धेत हेल्मेट भोला याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं.

कोल्हापुरातल्या रेड्याची सर्वत्र चर्चा

या रेड्याने फक्त स्पर्धेतच सर्वाचं लक्ष वेधून घेतले नाही, तर संपूर्ण परिसरात याच रेड्याची चर्चा आहे. कोल्हापूर म्हटलं की कुठल्याही गोष्टीला कमी नसते, म्हणूनच म्हणतात जगात भारी कोल्हापुरी. मग ते कोल्हापूरकरांचं रांगडी बोलणं असो, तांबडा-पाढरा असो, किवा ऊसाचे फड आणि तालमी असो, कोल्हापूर नेहमी चर्चेत असते. आणि आता कोल्हापुरातल्या रेड्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें