कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या, अन्यथा मिळणार नाही ट्रेनमध्ये प्रवेश

आजपासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे.

कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या, अन्यथा मिळणार नाही ट्रेनमध्ये प्रवेश
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 27, 2020 | 8:43 PM

रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वारंवार सूचना करूनही तपासणीकरीता रेल्वेच्या वेळेपूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वेने आता कडक पावले उचलली आहेत. आजपासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी वेळेत रेल्वे स्थानकात हजर न झाल्यास उशिरा येणाऱ्या प्रवाशाला रेल्वेत प्रवेश दिला जाणार नाही. कोकण रेल्वे आजपासून रत्नगिरी सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात याबाबतची कडक अंमलबजावणी करणार आहे. (Konkan Railway taken strict action against passengers who do not reach station before the scheduled time)

कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली असली तरी अद्याप कोव्हिडचा धोका पूर्णतः टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी करत आहे. याकरिता रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रवाशांनी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावं असं आव्हान करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वे याबद्दल प्रवाशांना सूचना देत आहे.

सुरुवातीला या आवाहनाला प्रवाशांंनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते. आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबलं जाणार आहे. यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या बाहेर रहावं लागू शकतो त्यामुळे तुमच्या प्रवासालाही विलंब होण्याची शक्यता आहे.

जीवघेण्या कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रवाशांची तपासणी केली जाते. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी कोकण रेल्वे सर्व त्या खबरदारी घेत आहे. त्यामुळे केले जाणारे सर्व उपाय हे प्रवाशांच्या आरोग्याच्या हिताचेच आहेत. या सगळ्यासाठी कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व स्थानकात अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाशांची साथ अपेक्षित आहे.

त्यामुळे आजपासून तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर निर्धारित वेळेपूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचा, अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर तुमची ट्रेन चुकू शकते.

इतर बातम्या –  

उद्धव ठाकरेंचे एकत्र लढण्याचे संकेत, नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन   

आताच उघडा जनधन खातं, मोफत मिळणार 10 लाखांचा विमा; सोबत आहेत धमाकेदार ऑफर्स

(Konkan Railway taken strict action against passengers who do not reach station before the scheduled time)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें