आताच ऑर्डर करा RuPay Card, मोफत मिळणार 10 लाखांचा विमा; सोबत आहेत धमाकेदार ऑफर्स

यामध्ये एटीएम कार्ड होल्डर्सला खास ऑफर्स आणि डिस्काऊंट देण्यात येत आहे. जाणून घेऊयात काय आहेत खास ऑफर्स...

आताच ऑर्डर करा RuPay Card, मोफत मिळणार 10 लाखांचा विमा; सोबत आहेत धमाकेदार ऑफर्स
मागच्या वर्षी हे 37,424.78 कोटी रुपये होतं. ICICI Bank चं वित्तीय उत्पन्न गेल्या वर्षी याच काळात 341 कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीमध्ये 542 कोटी रुपयांवर गेलं आहे.

नवी दिल्ली : रुपे कार्डधारकांना विविध ब्रँडच्या खरेदीवर 65 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असल्याची माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडून देण्यात आली आहे. एनपीसीआयने एका निवेदनातून ग्राहकांसाठी ही खास माहिती दिली आहे. उत्सवाच्या सीझनमध्ये अकाऊंट उघडणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर देण्यात आली आहे. ATM कार्ड देणारी कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने रुपे फेस्टिव्ह कार्निव्हलला (Rupay Festive carnival) सुरुवात केली आहे. यामध्ये एटीएम कार्ड होल्डर्सला खास ऑफर्स आणि डिस्काऊंट देण्यात येत आहे. जाणून घेऊयात काय आहेत खास ऑफर्स… ( rupay festive carnival jandhan account holders will get 10 lakh rupees gift on)

NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ग्राहकांकडे Rupay कार्ड असेल त्यांना अनेक श्रेणींमध्ये फायदा मिळणार आहे. यामध्ये हेल्थ, फिटनेस, शिक्षण आणि इ-कॉमर्स क्षेत्रामध्येही ऑफर्स मिळणार आहेत. यामुळे या वर्षी तुम्ही उत्सव सीझनमध्ये डबल आनंद लुटू शकता. यासोबत तुम्हाला डायनिंग, फूड डिलिव्हरी, खरेदी, मनोरंजन, वेलनेस आणि फार्मसीसारख्या कॅटेगरीमध्येही धमाकेदार ऑफर्ससोबत वस्तू खरेदीच्या सवलती मिळणार आहेत.

एकाच गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला मिळवा 19 हजार, आयुष्यभर होईल कमाई!

चेक करा कुठे आणि किती मिळतंय डिस्काऊंट? रुपे फेस्टिव्ह कार्निवलमध्ये ई-कॉमर्स शॉपिंगपासून ते शिक्षणावरील सवलत मिळत आहे. >> Myntra वर 10 टक्के सूट मिळत आहे. >> टेस्टबुक डॉटकॉमवर टेस्ट पासवर 65 टक्के सूट मिळत आहे >> सॅमसंगच्या TV, AC आणि स्मार्टफोनवर 52 टक्के सूट मिळणार आहे. >> बाटावर 25 टक्के सूट आहे >> पी अँड जी प्रॉडक्टवर 30 टक्के सूट मिळत आहे.

कॅशलेस पेमेंटला मिळणार चालना NPCI ने देशभरात कॅशलेस सिस्टमला चालना देण्यासाठी या ऑफर्स दिल्या आहेत. या व्यतिरिक्त ग्राहक अॅमेझॉन, स्विगी, सॅमसंग, मिंत्रा, आयिजो, फ्लिरकार्ट, शॉपर्स स्टॉप, लाइफस्टाईल, बाटा, हेमलिस, जी5, टाटा स्काय, मॅक्डोनल्ड डोमिनो, डाइनआउट स्विगी, अपोलो फार्मसी, नेटमेड्स सारख्या मोठ्या ब्रॅन्डवर उत्सवी सीझनमध्ये 10-65 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे.

तुमच्या खात्यात परत येतील पैसे, कर्जाच्या व्याज सवलती संदर्भात सरकारकडून गाइडलाईन्स जारी

मोफत मिळणार 10 लाख रुपयांचा विमा >> रूपे सेलेक्ट क्रेडिट कार्ड (RuPay Select Credit Card) सोबत 10 लाख रुपयांचा व्यक्तिगत दुर्घटना विमा कव्हर देण्यात आला आहे.

>> परदेशी कार्डचा उपयोग केल्यावर, एटीएमवर 5 टक्के कॅशबॅक आणि पीओएसवर 10 टक्के कॅशबॅक देण्यात आला आहे. काय आहे RuPay कार्ड

रुपे हा रुपये आणि पे या दो इंग्रजी शब्दांना मिळवून तयार केलेला शब्द आहे. आपण सध्या वापरत असलेले व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्डची पेमेंट सिस्टम परदेशी आहे.

( rupay festive carnival jandhan account holders will get 10 lakh rupees gift on)

(नोट : खातं उघण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

Published On - 6:45 pm, Tue, 27 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI