दशकातील शेवटचे सूर्यग्रहण, कुठे दिसेल आणि कधीपर्यंत प्रभाव राहील?

वर्ष 2019 चे आज (26 डिसेंबर) शेवटचे सूर्यग्रहण (Solar eclipse india) आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण नसून कंकणाकृती सूर्यग्रहण आहे.

दशकातील शेवटचे सूर्यग्रहण, कुठे दिसेल आणि कधीपर्यंत प्रभाव राहील?

मुंबई : वर्ष 2019 चे आज (26 डिसेंबर) शेवटचे सूर्यग्रहण (Solar eclipse india) आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण नसून कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण देशातील दक्षिण भाग केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दिसेल, तर महाराष्ट्रासह देशातील इतर भागात खंडग्रास ग्रहण म्हणून दिसेल.

ज्योतिषांच्या माहितीनुसार, धनू राशी आणि मूल नक्षत्रामध्ये  हे ग्रहण होणार आहे. सूर्यासोबत केतू, बृहस्पती आणि चंद्रमा इतर ग्रह असल्यामुळे हा कल्याणकारी योग मानला जातो. या ग्रहणाचे (Solar eclipse india) विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

रिंग ऑफ फायर

भारतात सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी ग्रहण लागेल. वैज्ञानिकांनी या ग्रहणाला रिंग ऑफ फायर असं नाव दिले आहे. यावर्षी पहिल्यांदा 6 जानेवारी आणि 2 जुलै 2019 रोजी सूर्यग्रहण लागले होते.

या राज्यात ग्रहणाचा प्रभाव

भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण देशातील दक्षिण भाग कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये दिसेल. तर महाराष्ट्रासह देशातील इतर भागात खंडग्रास सूर्यग्रहण म्हणून दिसेल.

ग्रहणाची वेळ 

भारतीय वेळेनुसार, खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी आठ वाजता लागेल. कंकणाकृती सूर्यग्रहणाची अवस्था सकाळी 9.06 वाजता सुरु होईल. कंकणाकृती सूर्यग्रहणाची अवस्था दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी संपेल. तर ग्रहणाची खंडग्रास सूर्यग्रहणाची अवस्था दुपारी एक वाजून 36 मिनिटांनी संपेल.

काय आहे सूर्यग्रहण?

सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्रमा आल्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहचत नाही. या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहणाचे प्रकार

सूर्यग्रहणाचे खग्रास, कंकणाकृती आणि खंडग्रास असे तीन प्रकार आहेत. ज्यावेळी चंद्रामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्यास खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. ज्यावेळी चंद्रामुळे सूर्य मध्यभागात गोलाकृती आकारात झाकला झातो त्यास कंकणकृती सूर्यग्रहण म्हणतात. तर ज्यावेळी चंद्रामुळे सूर्य अंशत: झाकला जातो त्यावेळ खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

तुमच्या शहरात प्रभाव

कंकणाकृती ग्रहण देशातील उत्तर आणि दक्षिण बाजूने पुढे गेल्यावर खंडग्रास सूर्यग्रहणाचा अवधी घटेल. चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येईल तेव्हा तो सूर्याला झाकून टाकेल. देशातील प्रत्येक शहरात ही अवस्था वेगवेगळी दिसेल. बंगळुरुमध्ये 90 टक्के, चेन्नईमध्ये 85 टक्के, मुंबईमध्ये 79 टक्के, कोलकातमध्ये 45 टक्के, दिल्लीमध्ये 45 टक्के, पटनामध्ये 42 टक्के, गुवाहटीमध्ये 33 टक्के, पोर्ट ब्लेअरमध्ये 70 टक्के आणि सिलचरमध्ये 35 टक्के सूर्य झाकलेला दिसेल.

जगात ग्रहणाचा प्रभाव

सूर्याचे कंकणाकृती ग्रहण सौदी अरब, कतर, ओमान, संयुक्त अरब अमीरात, भारत, श्रीलंकेचा उत्तर भाग, मलेशिया, सिंगपूर, सुमात्रा आणि बोर्निओवरुन हे ग्रहण दिसेल.

पुढील सूर्यग्रहण

पुढील सूर्यग्रहण भारतात 21 मे 2020 मध्ये दिसणार आहे. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण असणार. कंकणाकृती अवस्थेचे सूर्यग्रहण उत्तर भारतात दिसेल. तर देशातील इतर भागात हे खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

“कंकणाकृती सूर्यग्रहण नऊ वर्षापूर्वी 15 जानेवारी 2010 रोजी दिसले होते. हे ग्रहण देशाच्या दक्षिण भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल, तर इतर भागातून खंडग्रास सूर्यग्रहण म्हणून दिसणार आहे. मी हे ग्रहण पाहण्यासाठी ठाण्यामध्ये आलो आहे. माझ्यासोबत अनेक खगोल प्रेमीसुद्धा आहेत. ग्रहणाबद्दल लोकांचे खूप गैरसमज आहेत. ग्रहणात मंदीर बंद ठेवतात कारण त्यांच्या मनात काही गैरसमज आहे. एक भीती आहे”, असं ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Published On - 8:30 am, Thu, 26 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI