Ira Khan : जगणं सुसह्य आणि संतुलित व्हावं; आयरा खानकडून ‘अगत्सु फाउंडेशन’ची सुरुवात

Ira Khan : जगणं सुसह्य आणि संतुलित व्हावं; आयरा खानकडून 'अगत्सु फाउंडेशन'ची सुरुवात

आयरानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं या फाउंडेशनबद्दल माहिती दिली आहे. (Life should be comfortable and balanced; Agatsu Foundation by Ira Khan)

VN

|

May 26, 2021 | 5:49 PM

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अर्थात अभिनेता आमीर खानची लेक आयरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आता आयरा खाननं नुकतंच आपल्या सोशल मीडियावर ‘अगत्सु फाउंडेशन’ (Agastu Foundation) सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. या फाउंडेशनच्या ती माध्यमातून मानसिक आरोग्य समर्थन, शरीर जागरूकता कार्यक्रम आणि आत्म-साक्षात्कार यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर 

आयरानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, ‘मी आज एक सेक्शन 8 कंपनीची नोंदणी केली आहे. ज्याचं नाव आहे ‘अगत्सु फाउंडेशन’. मला खात्री आहे की या फाऊंडेशनचा अनेकांना फायदा होईल. मानसिक आरोग्य समर्थन, शरीर जागरूकता कार्यक्रम आणि आत्म-साक्षात्कार यासाठी प्रोत्साहन देण्यात येईळ. चला पहुयात!’

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

माझं नाव ‘इरा’ नाही ‘आयरा’

काही दिवसांपूर्वी आयरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिनं सर्वांची कान उघडणी केली होती. नेहमी प्रत्येकाच्या नावात आपण गोंधळ करतो. असंच काहीसं आयरा सोबत घडलं हा व्हिडीओ शेअर करत तिनं आपल्या नावाचा उच्चार कसा करायचा हे शिकवलं होतं. आयरा व्हिडीओमध्ये म्हणाली होती, ‘माझ नाव इरा नाही आयरा आहे. माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, मला तुम्हाला सांगायचं आहे माझं नाव इरा नाही तर आयरा आहे. आय म्हणजे डोळे आणि रा.. आयरा. तुम्ही सगळेच माझं नाव चुकीचं उच्चार करता त्यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात. माध्यमातही माझं नाव इरा म्हणून संबोधलं जातं. पण ते आयरा आहे.’

एवढंच नाही तर तिनं जर माझं नाव चूकीचं उच्चारलं तर 5000 रुपये दंड पडणार आणि ते 5000 रुपये मी डोनेट करणार असंही सांगितलं होतं. आयराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या

Rashmika Mandana : रश्मिका मंदानाचं #SpreadingHope; असामान्य कार्य करणाऱ्यांच्या कहाण्या करणार शेअर!

Khatron Ke Khiladi 11: आरा रा रा खतरनाक… कधी साडी, तर कधी शॉर्ट ड्रेस… श्वेता तिवारीचा जलवा पाहाच!

Photo : ‘The Family Man’चा अत्यंत खतरनाक दहशतवादी मूसा रहमान कोण?; वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें