LIVE : वारिस पठाण नाही लावारीस पठाण, अर्जुन खोतकरांची वारिस पठाणांवर टीका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE : वारिस पठाण नाही लावारीस पठाण, अर्जुन खोतकरांची वारिस पठाणांवर टीका

[svt-event title=” वारिस पठाण नाही लावारीस पठाण, अर्जुन खोतकरांची वारिस पठाणांवर टीका ” date=”22/02/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] जालना : वारिस पठाण व्यक्तव्य प्रकरण, वारिस पठाण लावारीस पठाण आहेत, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा वारिस पठाणांवर घणाघात, वारिस पठाण भेटल्यावर त्यांच्या कानशिलात लगावणार, खोतकरांचा वारिस पठाण यांना इशारा [/svt-event]

[svt-event title=”दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, तरुणाचा मृत्यू” date=”22/02/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] वर्धा : कारंजा येथून गावाला दुचाकीने जात असलेल्या युवकाच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू , हेमराज कोकाटे हा कारंजा येथून आपल्या गावी सावल येथे जात असतांना दुचाकीवरील त्याचं नियंत्रण सुटलं, दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली, हेमराजच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या” date=”22/02/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : मंगरुळ दस्तगीर येथे प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, हत्या करुन पोत्यात तारेने बांधून मृतदेह वर्धा नदीपात्रात फेकला, हनुमंत साखरकर असे मृत पतीचे नाव, मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल, हत्येचा कट रचणारी पत्नी आणि प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात [/svt-event]

[svt-event title=”लातुरात विहरीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू” date=”22/02/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] लातूर : विहरीत पडल्याने दोघांचा मृत्यू, उदगीर शहरातल्या निडेबन शिवारातील घटना, विहरीच्या कठड्यावर दारु पित बसलेल्या मारुती मामुलवार (वय-58), बालाजी मामुलवार या पिता-पुत्राचा मृत्यू, मुलगा तोल जाऊन विहरीत पडल्याने वडील वाचवायला गेले, दोघांचाही बुडून मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मनसेची ‘बांगलादेशी घुसखोर चले जाव’ मोहीम” date=”22/02/2020,9:33AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यात मनसेची ‘बांगलादेशी घुसखोर चले जाव’ मोहीम, धनकवडी परिसरात राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना मनसे स्टाईलने बाहेर काढले, मनसेने घराबाहेर काढलेल्या संशयित बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”जळगावात चिमुकल्यासमोर गळफास घेत विवाहितेची आत्महत्या” date=”22/02/2020,9:31AM” class=”svt-cd-green” ] जळगाव : पाचोरा शहरात 26 वर्षीय विवाहीतेची चिमुरड्यासमोर गळफास घेत आत्महत्या, आत्महत्येच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात हडपसर परिसरातील कागद पुठ्ठा असलेल्या गोडाऊनला आग” date=”22/02/2020,9:29AM” class=”svt-cd-green” ] पुणे : हडपसर येथील सातव नगरातील स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल परिसराते कागद पुठ्ठा असणाऱ्या गोडाऊला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

[/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI