तेलंगणातील लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री केसीआर यांची मोठी घोषणा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे (Lockdown extension in Telangana).

तेलंगणातील लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री केसीआर यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 12:22 AM

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे (Lockdown extension in Telangana). आता तेलंगणात 29 मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत लागू आहे. मात्र, तो संपण्याआधीच लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली. असं करणारं तेलंगणा देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले, “कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तेलंगणात 29 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहायला हवं. तेलंगणात कोरोनाचे एकूण 1 हजार 96 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 628 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात पीपीई कीट देखील उपलब्ध आहेत. देशातील मृत्यूदर 3.37 असताना तेलंगणातील मृत्यूदर 2.64 वर आहे.”

नागरिकांनी आपल्या दैनंदिन वापरातील जीवनावश्यक गोष्टी सायंकाळी 6 वाजण्याच्या आधी खरेदी कराव्यात. सायंकाळी 7 नंतर राज्यभरात कर्फ्यू लागू होईल. 6 वाजल्यानंतर कुणीही घराबाहेर दिसल्यास पोलीस कठोर कारवाई करतील, असं नमूद करत चंद्रशेखर राव यांनी नागरिकांनाही नियमांचं पालन करण्याच्या सुचना केल्या.

उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यातही 31 मेपर्यंत लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये देखील जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या निर्बंधांची मुदत वाढवत 31 मेपर्यंत मुदतवाढ केली आहे. गाजियाबादचे जिल्हाधिकारी अजय शंकर पांडे यांनी मंगळवारी (5 मे) याबाबत आदेश दिले. या आदेशानुसार सार्वजनिक स्थळांवर थुंकण्यावरही बंदी आहे. तसेच असं करताना आढळल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक स्थळांवर मास्क वापरणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात दिवसभरात पाच जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 2,201 वर

Corona Live Update : तेलंगणातील लॉकडाऊनची मुदत 29 मेपर्यंत वाढली

Mumbai Lockdown | मुंबईतील सर्व सवलती रद्द; दारु विक्री बंद, बेशिस्तीमुळे आयुक्तांचा निर्णय

Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर, दिवसभरात 841 नवे रुग्ण

Lockdown extension in Telangana

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.