Unlock 2 | ठाकरे सरकारची अनलॉक 2 ची तयारी, कसा असू शकतो अनलॉक 2 ?

महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ठाकरे सरकारकडून 'अनलॉक 2' ची तयारी सुरु (Maharashtra Government Unlock 2 Plan) आहे.

Unlock 2 | ठाकरे सरकारची अनलॉक 2 ची तयारी, कसा असू शकतो अनलॉक 2 ?
Follow us
| Updated on: Jun 27, 2020 | 5:04 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मात्र महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ठाकरे सरकारकडून ‘अनलॉक 2’ ची तयारी सुरु आहे. लॉकडाऊन करतेवेळी ज्याप्रकारे खबरदारी घेण्यात आली होती, तशाच प्रकारे खबरदारी घेऊन अनलॉक करण्यात येत आहे. ठाकरे सरकारचा ‘अनलॉक 2’ चा प्लॅन नेमका कसा असू शकतो, याबाबत अनेक तर्क-विर्तक लावले जात आहे. (Maharashtra Government Unlock 2 Plan)

महाराष्ट्रात येत्या 1 जुलैपासून एसटी बस, रिक्षा, टॅक्सी यासारखी सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातंर्गत अडकलेल्या किंवा रोजगारीसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांसाठी सरकार एसटी सुरु करु शकतं. मात्र मुंबई, पुणे यासारख्या कोरोनाने विळखा घातलेल्या शहरात मात्र कठोर निर्बंध घालून एसटी सुरु करण्याची शक्यता आहे.

तर मुंबई, पुण्यात कंपनी सुरु झाल्या आहे. अनेक कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. मात्र त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रिक्षा, टॅक्सी गरजेची आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ऑड-इव्हन पद्धतीने रिक्षा-टॅक्सी सुरु करता येतील का, याचा विचार सुरु आहे.

प्रत्यक्ष शाळा-कॉलेज सुरु करणार

जुलै महिन्यापासून रेड झोन नसलेल्या भागात नववी, दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शाळा कॉलेज सुरु करण्याबाबत विचार सुरु आहेत. तसेच जुलैमध्ये दहावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियाही सुरु केल्या जाऊ शकतात. ज्या ठिकाणी शाळा सुरु करणे शक्य नाही, तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्यात येईल. (Maharashtra Government Unlock 2 Plan)

शहरातील विविध मॉल्समधील दुकानही alternet पद्धतीने सुरु करता येतील का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

असा असू शकतो सरकारचा अनलॉक 2 प्लॅन?

1. जुलै महिन्यापासून आंतरजिल्हा एसटी सुरु करण्यावर विचार 2. मुंबई-पुण्यासाठीही कडक नियमांसह एसटी सुरु करण्याचा प्रयत्न 3. सम विषम नंबर प्लेट प्रमाणे रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर धावू शकतात का यावर विचार 4. रेड झोन मध्ये नसलेल्या 9, 10, 12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून सुरु करण्याचा विचार 5. तर 6 वी ते 8 वी चे प्रत्यक्ष वर्ग ऑगस्टपासून, 6. वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरु करण्यावर विचार 7. दहावी निकालानंतर इयत्ता 11 वीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन 8. जिथे शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने पायलट प्रोजेक्ट 9. स्थानिक किंवा नातेवाईंकासाठी काटेकोरपणे नियम पाळूनच प्रवेश 10. रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेणार 11. कंटेन्मेंट क्षेत्राकडे अधिकाधिक देऊन क्षेत्र जितकं लहान ठेवता येईल तितकं लहान ठेवण्याचा प्रयत्न 12. या क्षेत्रांमध्ये रोज तपासण्या, फवारणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा प्लॅन आहे 13. मॉल्समधील दुकानं अल्टर्नेट सुरु करण्यावर विचार सुरु 14. सिनेमा, नाट्यगृहांवर अद्याप कोणाताही निर्णय नाही 15. केद्रांच्या ग्रीन सिग्नलनंतर राज्यात लोकल सेवा सुरु होणार

पंतप्रधान मोदींच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अनलॉक 2.0 बाबत सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी (17 जून) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, दिल्लीसह इतर 20 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना अनलॉक 2.0 बाबत नियोजन करण्याचा सल्ला दिला. (Maharashtra Government Unlock 2 Plan)

“अनलॉक 1.0 नंतर ही आपली पहिली भेट आहे. आता आपल्याला अनलॉक 2.0 बद्दल विचार करायला हवा. याशिवाय कोरोना नियंत्रणात कसा येईल, यासाठीदेखील प्रयत्न करायचे आहेत”, असं पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना म्हणाले.

संबंधित बातम्या : 

Unlock 2.0 l आता अनलॉक 2.0 चं नियोजन करा, पंतप्रधान मोदींच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

Unlock 1 | खिडक्या उघडा, तीन फुटांवर बसा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.