लघु उद्योजकांसाठी ठाकरे सरकारचं पॅकेज तयार, लवकरच घोषणा : उद्योग मंत्री

लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी (Subhash Desai On Business Industry Package) दिली. 

लघु उद्योजकांसाठी ठाकरे सरकारचं पॅकेज तयार, लवकरच घोषणा : उद्योग मंत्री
Follow us
| Updated on: May 26, 2020 | 10:50 PM

मुंबई : केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनदेखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत (Subhash Desai On Business Industry Package)  करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योगचक्र हळूहळू गतीमान होत आहे. सध्या राज्यात 50 हजार (Subhash Desai On Business Industry Package)  उद्योग सुरू झाले असून त्यात 13 लाख कामगार रुजू झाले आहेत. तर 43 हजार कारखान्यांनी परवाने मागितले आहेत.

दरम्यान, रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार आणि दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत येत्या 1 जूननंतर शासन निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सुभाष देसाईंनी दिली.

औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे कुशल-अवकुश मनुष्यबळाची नोंदणी केली जाणार आहे. याद्वारे ज्या ठिकाणी कामगारांची गरज भासेल. त्याठिकाणी कामागरांचा पुरवठा केला जाणार आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षात राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले. यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांची उद्योग विभागाकडे नोंद आहेत. त्यातील तरुणांना देखील रोजगाराची संधी निर्माण करून दिली जाणार आहे.

विदेशी गुंतवणुकीसाठी एमआयडीकडे 40 हजार हेक्टर जमीन सर्व सुविधांसह सज्ज आहे. विदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. देश-विदेशातील लघु उद्योगांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करावी, असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी (Subhash Desai On Business Industry Package)  केले.

संबंधित बातम्या : 

फडणवीसांच्या आकडेवारीची सोप्या भाषेत चिरफाड करु : परिवहन मंत्री अनिल परब

28 हजार कोटी दिले ते नेहमीचेच, वेगळं पॅकेज नाही, भाजपने महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं : नवाब मलिक

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.