LIVE | लोकशाहीत हत्या करुन मतं मिळत नाहीत : मोदी

देश आणि राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि प्रत्येक घडामोडीचे लेटेस्ट अपडेट फक्त एका क्लिकवर

LIVE | लोकशाहीत हत्या करुन मतं मिळत नाहीत : मोदी


[svt-event title=”लोकशाहीत हत्या करुन मतं मिळत नाहीत : मोदी” date=”11/11/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ] देशात काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. हत्या करुन मत मिळत नाही. आपण लोकशाहीसाठी समर्पित आहोत. भाजपतील कार्यकर्ते आपल्या उद्देशापासून तसुभरही डगमगणार नाहीत. निवडणुकीतल यश भाजपला ताकद देत राहतात. देशाला मी विश्वास देतो की आम्ही आमचे काम निष्ठेने करत राहू. [/svt-event]

[svt-event title=”देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी युवकांनी भाजपमध्ये सामील व्हावं : मोदी” date=”11/11/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ] देशातील युवकांनी आवाहन करतो. युवकांनी यावं, भाजपमध्ये सामील व्हावं. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी युवकांनी भाजपमध्ये सामील व्हावं. युवकांनी आपल्या स्वप्नांसांठी भाजपमध्ये यावं. [/svt-event]

[svt-event title=”काश्मीर ते कन्याकुमारीपासून भारतात फॅमिली पक्षांचं जाळं : मोदी” date=”11/11/2020,8:04PM” class=”svt-cd-green” ] भारतातील युवापिढी लोकशाहीवर विश्वास ठेवते. युवक आपल्या हक्कांविषयी जागरुक असतो. काश्मीर ते कन्याकुमारीपासून भारतात फॅमिली पक्षांचं जाळं निर्माण झालं आहे. देशातील प्रत्येक नागरिक ही गोष्ट जाणतो. परिवारवादी पक्ष देशाच्या लोकशाहीला घातक आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मी बिहारच्या महिलांचे आभार मानतो : मोदी” date=”11/11/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ] प्रत्येक घरात वीज, 1 रुपयात सॅनिटरी पॅड, प्रत्येक घरात पाणी यासाठी भाजपने प्रयत्न केला. भाजपला महिलांनी सायलेटं व्होटर म्हणून मतदान केले. बिहारच्या महिलांनी भाजपला साथ दिली. मी महिलांचे आभार मानतो. [/svt-event]

[svt-event title=”LIVE | बिहारमध्ये “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” जिंकला : मोदी” date=”11/11/2020,7:57PM” class=”svt-cd-green” ] कोरोना काळात वाचवला गेलेला प्रत्येक जीव म्हणजेच भारताचं यश आहे. प्रत्येकाला वाटत असेल की मोदींनी बिहारबद्दल बोलावं. बिहारच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला. बिहारमध्ये विकासकार्याचा विजय. बिहारमध्ये युवक जिंकला आहे. महिला जिंकल्या आहेत. बिहारमध्ये “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वा” जिंकला आहे. [/svt-event]]

[svt-event title=”देशाच्या प्रत्येक नागरिकाने भाजपला वाढवले : मोदी” date=”11/11/2020,7:50PM” class=”svt-cd-green” ] काल जे निकाल आले त्याचा अर्थ खोल आहे. त्याचे उद्दीष्टे खूप मोठे आहेत. भाजप पूर्वेत जिंकला. भाजपला गुजरात, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात विजय मिळाला. दोन केंद्रशासित प्रदेशातही निवडणूक झाली. लडाख, दिव-दमनमध्ये भाजपचा विजय झाला. देशाच्या प्रत्येक नागरिकाने भाजपला वाढवले आहे. [/svt-event]

[svt-event title=”बिहारमधील विजय हा जे. पी. नड्डा यांची कुशलता आणि प्रभावी रणनीतीचा परिणाम- मोदी” date=”11/11/2020,7:45PM” class=”svt-cd-green” ] कोरोना संकटात निवडणूक करणं सोपं नव्हतं. पण आपल्या व्यवस्था इतक्या मजबूत आहेत की, संकट काळात निवडणूक घेऊन भारताची ताकद दाखवली. या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचं जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. बिहारमधील विजय हा जे. पी. नड्डा यांची कुशलता आणि प्रभावी रणनीतीचाही परिणाम आहे. नड्डाजी तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत. [/svt-event]

[svt-event title=”निवडणूक आयोग, देशाचे सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाचंही अभिनंदन : मोदी ” date=”11/11/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ] निवडणूक आयोग, देशाचे सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाचंही अभिनंदन : मोदी [/svt-event]

[svt-event title=”महान देशाच्या महान जनतेचे आभार : नरेंद्र मोदी” date=”11/11/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ] महान देशाच्या महान जनतेचे मी आभार व्यक्त करतो. जनतेने निवडणुकीत पाठिंबा दिला म्हणून फक्त मी धन्यवाद मानत नाही तर लोकशाहीचे महान पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले, त्यामुळे जनतेचे आभार व्यक्त करतो. काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संपूर्ण देशाचं लक्ष टीव्ही, ट्विटरवर होतं. बिहारच्या निवडणुकीवरुन स्पष्ट झालं की लोकशाहीप्रती भारतीयांची जी आस्था आहे त्याचं उदाहरण संपूर्ण भारतात कुठेही नाही. [/svt-event]

[svt-event title=” मोदींनी फक्त देशाची चिंता नाही केली तर संपूर्ण जगाची काळजी घेतली : जे. पी. नड्डा” date=”11/11/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ] कोरोना संकट काळात मोदींनी फक्त देशाची चिंता नाही केली तर संपूर्ण जगाची काळजी घेतली. मोदींनी देशातील कंपन्यांना प्रेरित करुन देशात व्हेंटिलेटरचं उत्पादन तयार केलं. याचा उपयोग भारतासह इतर देशातील नागरिकांनाही झाला. कोरोना संकट काळात मोदींनी फक्त देशाची चिंता नाही केली तर संपूर्ण जगाची काळजी घेतली. [/svt-event]

[svt-event title=”भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाला सुरुवात ” date=”11/11/2020,7:25PM” class=”svt-cd-green” ] कोरोना संक्रमणामुळे भारताच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. पण मोदींनी लॉकडाऊन करुन जनतेचं संरक्षण केलं. लॉकडाऊनंतर मोदींनी देशाला कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलं. मोदींनी पीपीई कीट, व्हेंटीलेटर, टेस्टींग लॅब तसेच औषधी वेगवेगळ्या दे्शांना पुरवली, मोदींनी इतर देशांचीही काळजी घेतली. [/svt-event]

[svt-event title=”भाजप मुख्यालयात बिहारच्या विजयाचा जल्लोष, मोदींचे थोड्याच वेळात भाषण” date=”11/11/2020,7:19PM” class=”svt-cd-green” ] भाजप मुख्यालयात मोदींचे थोड्याच वेळात भाषण, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांची उपस्थिती [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात दाखल” date=”11/11/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात  दाखल, थोड्याच वेळात मोदींचे भाषण, बिहारच्या विजयानंतर मोदींचे भाषण, मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष [/svt-event]

[svt-event title=”बिहारच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन” date=”11/11/2020,6:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निफाडचा किमान पारा घसरला, 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद” date=”11/11/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : निफाडचा किमान पारा घसरला, दुसऱ्या दिवशीही किमान तापमानात घसरण, 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, तीन मजुरांचा मृत्यू” date=”11/11/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ] पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वडवली गावाजवळ काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, गुजरातहुन मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक स्टिअरिंग लॉक झाल्याने कंटेनराला मागून धडक दिल्याने अपघात, 3 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, तर 5 जणांना तलासरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल [/svt-event]

[svt-event title=”कळंबा मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न, तिघांना अटक” date=”11/11/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी पाडला हाणून, कारागृहाच्या भिंतीची जवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहोचवण्याचा होता इरादा, गांजा पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी केली अटक, कापून पुन्हा चिकटवलेले टेनिस बॉल, 15 ग्रॅम गांजा जप्त, वैभव कोठारी,संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी संशयितांची नावे, तिघेही संशयित पुण्याचे [/svt-event]

[svt-event title=”प्रसिद्ध कोराडी महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे” date=”11/11/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : प्रसिद्ध कोराडी महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा एकमताने निर्णय, विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 10 पदाधिकाऱ्यांची निवड, कोराडीतील महालक्ष्मी मंदिर मध्य भारतातील प्राचीन मंदिरापैकी एक, दरवर्षी लाखो भाविक येतात महालक्ष्मीच्या दर्शनाला [/svt-event]

[svt-event title=”केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानीचं नागपुरात आंदोलन, गडकरींच्या घरासमोर साजरी करणार दिवाळी” date=”11/11/2020,8:19AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज नागपुरात आंदोलन, केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आंदोलन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर साजरी करणार दिवाळी, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानीचं आंदोलन, संविधान चौकातून स्वाभिमानीचा मोर्चा जाणार गडकरींच्या घराकडे, स्वाभिमानीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असल्याची तुपकरांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरातल्या शाहू मार्केट यार्ड बाजार समिती येथे भरणारा जनावर, शेळी, बकरी, मेंढरी बाजार पुन्हा सुरु” date=”11/11/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोल्हापुरातल्या शाहू मार्केट यार्ड बाजार समिती येथे भरणारा जनावर, शेळी, बकरी, मेंढरी बाजार पुन्हा सुरु, येत्या 15 नोव्हेंबरपासून बाजार भरणार, बाजार समितीचा निर्णय, कोरोनामुळे गेल्या 7 महिन्यांपासून बाजर होता बंद, सर्व नियमांचे पालन करून बाजार भरणार [/svt-event]

[svt-event title=”धुळ्यात चोरट्याने एटीएम फोडलं, लाखो रुपये लंपास केल्याचा अंदाज” date=”11/11/2020,8:14AM” class=”svt-cd-green” ] धुळे : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या देवपूर भागातील, अॅक्सिस बँकेचे ATM चोरट्याने फोडले, अॅक्सिस बँकेचे ATM फोडून चोरट्याने लाखो रुपये लंपास केल्याचा अंदाज, ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, 2 दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षकाच्या घरात झाली होती चोरी [/svt-event]

[svt-event title=”‘हिवाळी अधिवेशनावर होणारा खर्च नागपूरातील आरोग्य यंत्रणेला द्या’, काँग्रेस आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र ” date=”11/11/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : ‘हिवाळी अधिवेशनावर होणारा खर्च नागपूरातील आरोग्य यंत्रणेला द्या’, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र , ‘अधिवेशन मुंबईत होणार असल्याने साधारण 50 कोटींच्या खर्चाची बचत’, बचत झालेले 50 कोटी नागपुरातील आरोग्य यंत्रणेला देण्याची केली मागणी, कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी होणार मुंबईला [/svt-event]

[svt-event title=”कोरोना लस वाटपासाठी दिवाळीपूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी द्या, नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश” date=”11/11/2020,7:44AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कोरोना लस वाटपासाठी दिवाळीपूर्वीच कोरोना योध्यांची यादी, दिवाळीपूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी देण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश, खाजगी रुग्णालयांची यादी दिवाळी पूर्वी मागवली, आतापर्यंत केवळ 180 रुग्णालयांनी 9550 कर्मचाऱ्यांची माहिती दिली, मनपा हद्दीतील 460 रुग्णालयांकडून कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसची प्रतिक्षा, केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार डेटाबेस तयार करण्याची लगबग [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात दिवाळी साजरी करताना कोव्हिड-19 चे नियम पाळणं बंधनकारक, अन्यथा कारवाई ” date=”11/11/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : दिवाळी साजरी करताना कोव्हिड-19 चे नियम पाळणं बंधनकारक, नागपूर मनपा आयुक्त बी. राधाकृष्ण यांचे आदेश,‘फटाके टाळा, मियम पाळा’ मनपा आयुक्तांचं आवाहन, सायलेंट झोनमध्ये फटाके फोडण्याची मनाई, फटाके, दिवे लावताना सॅनीटायझर ऐवजी साबन वापरण्याचा सल्ला, विनापरवानगी कार्यक्रम आयोजित केल्यास होणार कारवाई [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी शहरातील मध्यवस्तीत कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेची धाड, बेटिंग खेळणाऱ्यांना रंगेहात पकडले” date=”11/11/2020,7:39AM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील मध्यवस्तीत कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेची धाड, बेटिंग खेळणाऱ्यांना रंगेहात पकडले, मात्तबर खेळाडू ताब्यात, कारवाई नंतर इचलकरंजी स्थानिक गुन्हेशाखा आणि इचलकरंजी शहरातील तिन्ही पोलीस ठाणे खडबडून जागे, सट्टेतील काही आरोपी फरार पोलिसांचे पथक तपासासाठी रवाना, पोलीस ठाण्या बाहेर बड्या धेंड्याची गर्दी [/svt-event]

[svt-event date=”11/11/2020,7:38AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI