AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ‘ती’ यादी राज्यपालांकडे; महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात…

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली.

अखेर 'ती' यादी राज्यपालांकडे; महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
| Updated on: Nov 06, 2020 | 7:27 PM
Share

मुंबई: राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (maharashtra minister meets governor bhagatsingh koshyari )

आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. त्यानंतर या तिघांनीही राज्यपालांशी काहीवेळ चर्चा केली. मात्र, राज्यपालांना देण्यात आलेल्या नावांचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. आता ही यादी राज्यपालांकडे आल्यानंतर राज्यपाल त्यावर कधीपर्यंत निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व बाबींची पूर्तता केलीय

यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त 12 नावांची यादी राज्यपालांना दिली. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील असा विश्वास असल्याचं परब म्हणाले. तर, राज्यपाल यादी मंजूर करतील की नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही, असं सांगतानाच आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी चार-चार सदस्यांची नावं राज्यापालांना दिली आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी जे निकष आहेत. त्या निकषानुसारच ही यादी महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. राज्यपालांनी निकषाच्या आधारे सदस्यांची नावं नाकारू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कोणाकोणाची नावं चर्चेत?

शिवसेना

सुनील शिंदे – वरळीचे माजी आमदार, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडली

आदेश बांदेकर – शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपद दर्जा), 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर माहिममधून पराभव

सचिन अहिर – 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जातो, त्याची बक्षिसी म्हणून विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता

शिवाजीराव आढळराव-पाटील – सलग तीन वेळा शिरुरचे खासदार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव, आमदारकीतून राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं

वरुण सरदेसाई – युवासेना सरचिटणीस

राहुल कनाल – युवासेना पदाधिकारी

वरुण सरदेसाई यांच्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे – भाजपचा राजीनामा देत नुकतेच राष्ट्रवादीत आगमन, राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित

शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील मानले जातात

आदिती नलावडे – मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख, माजी विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दिवंगत दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय

सूरज चव्हाण – राष्ट्रवादी पदाधिकारी

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते

आनंद शिंदे – प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी निश्चित मानली जाते

काँग्रेस

सचिन सावंत – काँग्रेस प्रवक्ते

आशिष देशमुख – नागपूरमधील काटोलचे माजी आमदार, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश

नसीम खान – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री

मोहन जोशी – माजी विधानपरिषद आमदार, 2019 मध्ये पुण्यातून भाजप नेते गिरीश बापट यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव

सत्यजीत तांबे – महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष (maharashtra minister meets governor bhagatsingh koshyari )

संबंधित बातम्या:

Breaking | राज्यपाल नियुक्त विधान परिषदतेच्या सदस्यांची नावे आज सादर होणार

अकरावी प्रवेश प्रक्रिया ते राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

शिफारस केलेल्या व्यक्तींची नावं सादर करा; राज्यपाल नियुक्त संभाव्य सदस्यांविरोधात कोर्टात याचिका

(maharashtra minister meets governor bhagat singh koshyari )

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.