Corona : पुण्यातील बहुसंख्य कोरोना रुग्ण दाट लोकवस्तीतील, एकेका घरात आठ ते दहा कोरोना पॉझिटिव्ह

शहरात कोरोनाचे निदान होणारे बहुसंख्य रुग्ण हे दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टीतील आहेत. एकेका घरात आठ ते दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.

Corona : पुण्यातील बहुसंख्य कोरोना रुग्ण दाट लोकवस्तीतील, एकेका घरात आठ ते दहा कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 26, 2020 | 5:37 PM

पुणे : पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्या (Pune COVID-19 Spread) पार गेल आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे 1 हजार 70 रुग्ण आहेत. शहरात कोरोनाचे निदान होणारे बहुसंख्य रुग्ण हे दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टीतील आहेत. एकेका घरात आठ ते दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी परिसर हा कोरोनाचा उद्रेक थांबवायला मुख्य (Pune COVID-19 Spread) अडसर ठरत आहे.

पुण्यात 9 मार्चला कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण आढळला. आता शहराच्या 41 पैकी 14 प्रभागांमध्ये कोरोनाचा विळखा पसरला आहे. रविवारी सकाळपर्यंत पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 70 वर पोहोचली. तर कोरोनाने आतापर्यंत 72 जणांचा बळी घेतला आहे. महापालिका आत्तापर्यंत क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाबधितांचे विश्लेषण करत होती, त्यापुढे जाऊन प्रभाग निहाय काढलेल्या निष्कर्षातून दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टीच्या भागामुळे कोरोनाचा उद्रेक थांबविण्यास अडसर येत असल्याचे स्पष्ट झालं आहे.

सदाशिव, कसबा, भवानी, गंजपेठ, रास्तापेठ, लोहियानगर, कासेवाडी, शिवाजीनगर पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी अप्पर इंदिरानगर या प्रभागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्याच्या पश्चिम भागातील उपनगरात कोरोनाचा संसर्ग कमी आहे. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने झोपडपट्टीतील नागरिकांना पालिकांच्या शाळेत तात्पुरता निवारा उपलब्ध करुन दिला आहे.

कोरोनाचे कोणत्या भागात किती रुग्ण?

भवानी पेठ – 214

ढोले पाटील रोड – 160

शिवाजीनगर घोलेरोड – 133

कसबा विश्रामबाग – 127

येरवडा कळस धानोरी – 110

धनकवडी, सहकारनगर – 55

वानवडी, रामटेकडी – 54

हडपसर, मुंढवा – 30

नगर रोड, वडगावशेरी – 29

कोंढवा, येवलेवाडी – 13

सिंहगडरोड – 10

वारजे, कर्वेनगर – 09

औंध, बाणेर – 03

कोथरुड, बावधान – 01

पुण्याबाहेरचे – 49

एकूण – 1075

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे पोलिसांनी शहरातील कोणतेही निर्बंध (Pune COVID-19 Spread) शिथिल केलेले नाहीत. शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्वीप्रमाणे दिलेल्या वेळेतच सुरु राहणार असल्याचे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. तर कोरोनावर उपचार करण्यात येत असलेल्या रुग्णालयांपैकी नायडू आणि ससून ही दोन्ही रुग्णालयं आता फुल्ल झाली आहेत. त्यामुळे येथील रुग्णांना आता इतरत्र हलविण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या संपूर्ण पुणे शहर सील करुन कर्फ्यू लावण्यात आलेला असला तरी पुणेकर मात्र घराबाहेर पडायचे थांबताना दिसत नाहीत. अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडायचे झाल्यास पोलिसांकडून डिजीटल पासद्वारे परवानगी घ्यावी लागते. पण, अनेक जण त्यासाठीही हास्यास्पद अशी कारण देत आहेत. त्यामुळे अशा पुणेकरांना पुणे पोलिसांनी थेट ट्विटरवरुन आव्हान दिलं आहे.

“ज्यांच्याकडे पास नाही किंवा कोणतीही गरज नसताना बाहेर जायचयं, त्यांनी खुशाल जा! पण आमची एक अट आहे. आधी 6 तास कोरोना संसर्ग झालेल्या “रेड झोन” मध्ये पोलिसांसोबत ड्युटी करुन दाखवावी. बोला मंजूर…?”, असं थेट चॅलेंज विनाकारण फिरणाऱ्या पुणेकरांना पुणे पोलिसांनी दिला आहे.

गेले तीन दिवस पुण्यात कोरोना बाधितांची संख्या ही जवळपास शंभरने वाढत आहे. तर पुण्याचा मृत्यूदरही देशात सर्वाधिक आहे. हळूहळू रुग्णालयातील बेडही फुल्ल होत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी नियमांचे पालन करण्याचं आवाहन प्रशासन (Pune COVID-19 Spread) करत आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील कोविड रुग्णालय दहा दिवसात फुल्ल, रुग्णांना अन्यत्र हलवण्याची वेळ

पुण्यात क्वारंटाईन केलेले 4 कोरोना संशयित विलगीकरण केंद्राबाहेरुन फरार

पुण्यात रेशन दुकानातून धान्य वितरण सुरु, गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियमावली

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल लॉकडाऊनमध्येच पाडणार, अजित पवारांच्या सूचना

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.