पुण्यात क्वारंटाईन केलेले 4 कोरोना संशयित विलगीकरण केंद्राबाहेरुन फरार

पुण्यात क्वारंटाईन करण्यात आलेले चौघे संशयित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नजर चुकवून रुग्णवाहिकेतून फरार झाले आहेत (Corona Suspect run from Quarantine Center in Pune).

पुण्यात क्वारंटाईन केलेले 4 कोरोना संशयित विलगीकरण केंद्राबाहेरुन फरार
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 11:48 PM

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करणे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवणं अत्यावश्यक आहे. असं असतानाही पुण्यात क्वारंटाईन करण्यात आलेले चौघे संशयित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नजर चुकवून रुग्णवाहिकेतून फरार झाले आहेत (Corona Suspect run from Quarantine Center in Pune). या चौघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या चारही संशयितांना निरिक्षणाखाली ठेवण्यासाठी सिंहगड कॉलेजच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आणण्यात आले होते. मात्र, त्याच दरम्यान हे चौघे येथून पळाले.

पुण्यातील बिबवेवाडी भागात तळजाई पठार येथे एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. यानंतर आरोग्य यंत्रणेने त्याच्याकडून इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत तात्काळ त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास केला. यात संबंधित चौघे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याचं स्पष्ट झालं होते. त्यामुळे या चौघांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना सिंहगड कॉलेजच्या क्वारंटाईन सेंटर येथे नेण्यात आले. तेथे गेल्यावर वैद्यकीय कर्मचारी संबंधितांना दाखल करुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत असतानाच या चौघांनी गेट जवळ असतानाच नजर चुकवून पळ काढला.

दरम्यान, काही नागरिकांनी सिंहगड कॉलेज येथील क्वारंटाईन सेंटरच्या स्वच्छता आणि सुविधेबद्दल प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर याबाबत काही व्हिडीओ देखील फिरत आहेत. यामुळेच संबंधितांना पळ काढल्याचीही चर्चा होत आहे. असं असलं तरी कोरोना संशयितांचा हा बेजबाबदारपणा अनेकांना कोरोना संसर्गाच्या धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताणही वाढताना दिसत आहे.

पुण्यात कोरोनाचा विखळा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. पुण्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही वाढतो आहे. कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनामुळे 24 एप्रिल रात्रीपासून ते आतापर्यंत दोन पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बळींची संख्या आता 66 वर येऊन पोहोचली आहे.

पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक

पुण्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात तब्बल दीड महिन्यानंतर ही सर्वाधिक आहे. 24 एप्रिलपर्यंत पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक होता. पुण्याचा कोरोना मृत्यूदर 6.5 टक्के इतका आहे. तर, देशाचा कोरोना मृत्यूदर 3.2 टक्के आणि महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर 4.8 टक्के इतका आहे. म्हणजेच देशाच्या मृत्यूदरापेक्षा दुप्पट मृत्यूदर पुण्याचा आहे.

भारतात सध्या कोरोनाचे 20,080 रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक 6,817 कोरोना रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर, पुण्यात कोरोनाचे 980 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाहिला तर देशात आतापर्यंत 645 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, महाराष्ट्रात कोरोनामुळे 301 आणि पुण्यात 64 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, अतिरिक्त निर्बंध, डोअर टू डोअर स्क्रिनिंग, पोलीस कारवाया, केंद्रीय पथकाची पाहणी आणि त्यानंतर वेगवेगळे उपायोजना राबवल्या जात आहेत. मात्र, तरीही पुण्याचा कोरोना मृत्यूदर कमी होत नसल्याने प्रशासनाची चिंता (Pune Corona Death Update) वाढली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात तब्बल 811 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 7,628 वर

कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, 40 प्रयोगशाळांच्या मदतीने 1 लाखाचा टप्पा पार

पुण्यातील खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेल ताब्यात घ्या, अजित पवारांचे आदेश

Pune Corona : पुण्यात कोरोनाचं मृत्यूचक्र सुरुच, 24 तासात दोघांचा मृत्यू, आकडा 66 वर

Corona Suspect run from Quarantine Center in Pune

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.