Pune Corona Update | पुण्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत 195 कोरोना रुग्ण, कोणत्या वॉर्डात किती?

राज्यात काल (24 एप्रिल) 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली (Pune Corona Virus Update) आहे.

Pune Corona Update | पुण्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत 195 कोरोना रुग्ण, कोणत्या वॉर्डात किती?
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 12:33 PM

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Corona Virus Update) आहे. गेल्या दोन दिवसात पुण्यात 100 हून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या‬ वर पोहोचला आहे. तर राज्यात काल (24 एप्रिल) 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रात काल (24 एप्रिल) 960 कोरोनाबाधित रुग्णांची (Pune Corona Virus Update) नोंद करण्यात आली. यापैकी 923 कोरोनाबाधित रुग्णांचा नकाशाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. यातील हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सर्वाधिक जास्त 195 रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात कमी रुग्ण हे कोथरुड बावधन या ठिकाणी आढळले आहेत.

हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सोशल डिस्टन्सला हरताळ फासला जात आहे. अंतर्गत गल्लीबोळात नागरिकांची ये-जा सुरुच आहे. नागरिकांना गांभीर्य नसल्यानं धोका वाढण्याची भीती आहे. सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नागरिकांची अपमानास्पद वागणूक मिळत आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (शंभरहून अधिक रुग्ण)

  • येरवडा धानोरी – 104
  • भवानी पेठ – 195
  • ढोले पाटील – 134
  • कसबा विश्रामबाग – 124
  • शिवाजीनगर घोले रोड – 110

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (शंभरहून कमी रुग्ण)

  • नगर रोड वडगाव शेरी – 26
  • वानवडी रामटेकडी – 44
  • हडपसर मुंडवा – 28
  • पुण्याबाहेर – 44
  • कोंढवा येवलेवाडी – 12
  • बिबवेवाडी – 30
  • औंध बाणेर – 3
  • कोथरूड बावधन – 1
  • वारजे कर्वेनगर – 9
  • सिंहगड रोड – 10
  • धनकवडी सहकारनगर – 49

पुण्यात गेल्या दोन दिवसात शंभरी पार नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी (23) आणि शुक्रवारी (24 एप्रिल) या सलग दोन दिवसात 100 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर काल 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 64 वर पोहोचला आहे.

पुण्यात कोरोनामुळे उपचार घेत असलेल्या 41 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर आतापर्यंत 6 हजार 181 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 5 हजार 264 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.