Malegaon corona | मालेगावातील बडा कब्रस्तानात दफनविधीसाठी आठ दिवसात तिप्पट मृतदेह

कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावातील बडा कब्रस्तानात गेल्या आठ दिवसांत सरासरीपेक्षा तिप्पट मृतदेह दफनविधीसाठी आले (Malegaon death increase) आहेत.

Malegaon corona | मालेगावातील बडा कब्रस्तानात दफनविधीसाठी आठ दिवसात तिप्पट मृतदेह
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 5:24 PM

मालेगाव : कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावातील बडा कब्रस्तानात गेल्या आठ दिवसांत सरासरीपेक्षा तिप्पट मृतदेह दफनविधीसाठी आले (Malegaon death increase) आहेत. या धक्कादायक माहितीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. इतर वेळी बडा कब्रस्तानात दररोज सरासरी 7 ते 8 मृतदेह अंत्यविधीसाठी येतात. मात्र, 15 एप्रिलपासून हे प्रमाण तिप्पट झाले आहे. 15 एप्रिलला एकाच दिवशी मालेगावात कोरोनाव्यतिरिक्त 24 मृत्यू झाले आहेत. या महिनाभरात कोरोनामुळे येथील 14 जणांचा मृत्यू झाला, तर इतर आजारांमुळे 221 जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव बडी कब्रस्तानातील नोंदींवरून (Malegaon death increase)  पुढे येत आहे.

मालेगावामधील रुग्णांच्या संख्येचा आकडा शंभरीच्या पुढे गेला आहे. तर कोरोनाबळींची संख्या 14 झाली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात अन्य कारणांमुळे दगावलेल्यांचीसंख्या 225 च्या घरात गेली आहे. बड्या कब्रस्थानातील वार्षिक आकडेवारीवरून येथे दररोज सरासरी सात ते आठ मृतदेह दररोज दफनविधीसाठी येतात.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे प्रमाण वार्षिक सरासरीला धरून होते. मात्र 10 एप्रिलपासून बडा कब्रस्थानात येणाऱ्या मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसते. 15 एप्रिल या एका दिवशी या ठिकाणी तब्बल 24 मृतदेह दफनविधीसाठी आणण्यात आले होते. त्यानंतरही हे प्रमाण दररोजच्या सरासरीपेक्षा तिप्पट दिसते. मालेगावातील या वाढत्या मृत्यूदरामुळे परिस्थितीतील गुंता वाढत असल्याचे दिसते. कोरोनाच्या भीतीमुळे अन्य आजारांवर उपचार मिळत नसल्याने मालेगावातील मृतांची संख्या वाढवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कब्रीस्तानात दफनविधीसाठी झालेली वाढ 

1 एप्रिल 6 जणांचा मृत्यू

2 एप्रिल 4 जणांचा मृत्यू

3 एप्रिल 6 जणांचा मृत्यू

4 एप्रिल 5 जणांचा मृत्यू

5 एप्रिल 8 जणांचा मृत्यू

6 एप्रिल 6 जणांचा मृत्यू

7 एप्रिल 7 जणांचा मृत्यू

8 एप्रिल 6 जणांचा मृत्यू

9 एप्रिल 4 जणांचा मृत्यू

10 एप्रिल 7 जणांचा मृत्यू

11 एप्रिल 8 जणांचा मृत्यू

12 एप्रिल 10 जणांचा मृत्यू

13 एप्रिल 8 जणांचा मृत्यू

14 एप्रिल 9 जणांचा मृत्यू

15 एप्रिल 24 जणांचा मृत्यू

16 एप्रिल 14 जणांचा मृत्यू

17 एप्रिल 14 जणांचा मृत्यू

18 एप्रिल 18 जणांचा मृत्यू

19 एप्रिल 17 जणांचा मृत्यू

20 एप्रिल 22 जणांचा मृत्यू

21 एप्रिल 18 जणांचा मृत्यू

मालेगाव शहरतील मोमीनपुरा, कमालपुरा, नयापुरा, बेलबाग या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कालपर्यंत (23 एप्रिल) मालेगावमध्ये एकूण 945 नमुने घेण्यात आले आहेत. यामध्ये 409 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 110 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 130 निगेटिव्ह आले आहेत. 530 अहवाल हे प्रलंबित आहेत. आज (24 एप्रिल) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 116 झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 6427 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 840 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Corona : मालेगाव ‘कोरोना’ हॉटस्पॉट कसं बनलं?

मालेगावात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, बाधितांची संख्या शंभरीपार

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.