AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, थर्मल स्कॅनिंग, मास्कशिवाय प्रवास

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसत नाही. (Panchavati Express passenger not following corona guidelines)

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, थर्मल स्कॅनिंग, मास्कशिवाय प्रवास
| Updated on: Sep 14, 2020 | 11:01 PM
Share

नाशिक : एकीकडे ट्रेन्स सुरू करताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. तर दुसरीकडे या नियमांची रेल्वे प्रशासनातर्फे  सर्रास पायमल्ली केली जात आहे. शनिवारी 12 सप्टेंबरपासून मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसत नाही. (Panchavati Express passenger not following corona guidelines)

रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रत्येक सीटसाठी बुकिंग केले आहे. त्यामुळे एकमेकाला खेटून बसण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक प्रवासी मास्क न घालताच प्रवास करीत आहे.

तसेच रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचं थर्मल स्कॅनिंगदेखील केली जात नाही. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्याकरिता आम्ही प्रवाशांची पुरेपूर काळजी घेत असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा फोल ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येत आहेत. त्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

पंचवटी एक्स्प्रेस मध्ये सोशल डिस्टन्सिंचा फज्जा उडत आहे. तसेच इतर रेल्वे गाड्यांची परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नसावी, असे बोललं जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.(Panchavati Express passenger not following corona guidelines)

संबंधित बातम्या : 

व्याघ्र प्रेमींसाठी खुशखबर, ताडोबा पर्यटन पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली

निगेटिव्ह रिपोर्ट मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह, माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मृत्यूने गोंदियात खळबळ

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ