Lockdown : बॅकस्टेज आर्टिस्ट, मेक अप, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज यांच्या मदतीसाठी रंगमंच कामगार संघाचा पुढाकार

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले.

Lockdown : बॅकस्टेज आर्टिस्ट, मेक अप, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज यांच्या मदतीसाठी रंगमंच कामगार संघाचा पुढाकार
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 8:58 PM

मुंबई : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Marathi Celebrity Help ) रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे नागरिकही याला मोठा प्रतिसाद देत आहेत. मात्र, यासर्वांमध्ये ज्यांचं तळहातावर पोट आहे, अशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातून मराठी सिनेसृष्टी आणि रंगकमंचवर काम करणारेही सुटलेले (Marathi Celebrity Help) नाही. त्यामुळे अशा लोकांना मदत करण्यासाठी रंगमंच कामगार संघाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी या लोकांना शिधा आणि औषध पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इतर कलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलं आहे. प्रत्येकजण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. लवकरच बाहेर पडूच. पण आपली मराठी कलाकार म्हणून वाटचाल सुरु असताना ह्या प्रवासात ज्यांनी पाणी आणून दिलं, जेवण वाढलं, चेहऱ्याला लागलेला रंग जपायला मदत केली, कपडे इस्त्री केले, सेटवर खिळे ठोकले, नाटकाची प्रॉपर्टी सांभाळली. थोडक्यात ज्यांचं त्यादिवशीच्या पैशांवर/पाकिटावर पोट भरत होतं. अशांना आपण मदतीचा हात द्यायचं ठरवलं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या कलाकारांनी ह्या (Marathi Celebrity Help) आपत्तीतही गरजवंताला हात द्यायचं ठरवलं आहे. तेव्हा जशी यथाशक्ती मदत केलीत (काहींना व्यस्त असल्याने इच्छा असूनही करता आली नाही. आता करता येईल.) अशा सगळ्या मराठी कलाकारांना पुन्हा एक आवाहन करतो आहोत. बकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ इत्यादी, अशांना आपण काही दिवस पुरेल इतक्या शिधा आणि औषधं वगैरे इतर खर्चासाठी रोख रुपये 1000 अशी मदत करण्याचे ठरवले आहे. आपण शक्य होईल तितका आपला सहभाग द्या. (नाही दिलात तरी नाराजी नाही बरं का.)”, असं आवाहन रंगमंच कामगार संघाकडून करण्यात आलं आहे.

मदत करण्यासाठी त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहितीही पुरवली आहे.

रंगमंच कामगार संघ कार्पोरेशन बँक, शिवाजी पार्क शाखा. खाते क्र. – 520101006246016. IFSC कोड – CORP0000057.

सुबोध भावे, रत्नकांत जगताप,सुशांत शेलार, विनोद सातव, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, शिवाजी शिंदे, राजेश देशपांडे, विजू माने आणि सगळे मराठी कलाकार. संपर्क: 9820147601

मराठी कलाकारांची मदत

अभिनेत्री सई ताम्हणकरने कोरोनाशी लढा देण्यासाठी दीड लाखांची मदत केली. तसेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गुप्त मदत केली आहे. तर अभिनेते सुशांत शेलार आणि प्रशांत दामले यांनी बॅकस्टेज कलाकारांना मदत केली. सुशांत शेलार याने सगळ्यांना गृहउपयोगी वस्तू दिल्या. तर प्रशांत दामले यांनी सर्वांना (Marathi Celebrity Help) प्रत्येकी 10 हजार रुपये मदत दिली.

संबंधित बातम्या :

गंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी

Corona | सलमानची चित्रकला ते प्रणिती चोप्राचं गाणं, बॉलिवूड कलाकांरांचं सेल्फ क्वारंटाईन

संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी

नेहमी रात्री आठ वाजताच बोलून चार तास देतात, अनुराग कश्यपचा मोदींना टोला

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.