घरात येणाऱ्या माशांनी कोरोना होऊ शकतो : अमिताभ बच्चन

घरात येणाऱ्या माशांनी कोरोना होऊ शकतो, असं बॉलिवडूचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी (Amitabh bachhan talk on corona virus) सांगितले आहे.

घरात येणाऱ्या माशांनी कोरोना होऊ शकतो : अमिताभ बच्चन

मुंबई : “घरात येणाऱ्या माशांनी कोरोना होऊ शकतो”, असं बॉलिवडूचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी (Amitabh bachhan talk on corona virus) सांगितले आहे. कोरोना हा विषाणू मानवी विष्टेवर दोन आठवडे राहू शकतो, असं लॅसेन्टच्या रिसर्चमधून समोर आलं आहे. या रिसर्चच्या आधारावर अमिताभ यांनी हा आजार माशांद्वारे पसरु शकतो, असे सांगितले. याबद्दलचा एक व्हिडीओ बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये दाखवले की, एक माशी कशाप्राकारे हा आजार पसरवू शकते.

“प्रत्येकांनी दररोज, नेहमी, कायम आपल्या टॉयलेटचा वापर करा, दरवाजा बंद आजार बंद”, असं अमिताभ बच्चन यांनी या ट्वीट करत म्हटले आहे.

“आज मी तुम्हला खूप महत्तवाची गोष्ट सांगत आहे. आपल्या देशावर सध्या कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. आपण सर्वांनी मिळून या संकटाला दोन हात करायचे आहे. तुम्हाला माहित आहे का? चीनच्या तज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणू हा मानवी विष्टेवरही आठवडाभर जीवंत राहू शकतो”, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

“कोरोना विषाणूचा रुग्ण बरा झाल्यानंतरही काही दिवस त्याच्या विष्टेत कोरोनाचे विषाणू जीवंत असतात. जर त्या व्यक्तीच्या विष्टेवर एखादी माशी बसली आणि ती माशी फळ, भाज्यांवर बसली तर कोरोनाचा आजार सर्वत्र पसरु शकतो. यासाठी आपण सर्वांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येऊन स्वच्छ भारत मिशनच्या आंदोलन तयार करुन नागरिकांनी उघ्यावर शौचालय करण्यापासून रोखूया”, असंही अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारतात 600 पेक्षा अिधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात जवळपास चार लाख लोकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *