मारुतीच्या स्विफ्ट, ऑल्टोसह 10 गाड्यांच्या किंमतीत घट

Namrata Patil

Updated on: Sep 25, 2019 | 2:47 PM

देशातील सर्वात प्रसिद्ध ऑटो कंपनी मारुती सुझुकीने सणाच्या दिवसात आपली विक्री वाढवण्यासाठी काही गाड्यांच्या किंमती कमी (Maruti Suzuki Car Price cut) केल्या आहेत.

मारुतीच्या स्विफ्ट, ऑल्टोसह 10 गाड्यांच्या किंमतीत घट

नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रसिद्ध ऑटो कंपनी मारुती सुझुकीने सणाच्या दिवसात आपली विक्री वाढवण्यासाठी काही गाड्यांच्या किंमती कमी (Maruti Suzuki Car Price cut) केल्या आहेत. नुकतंच कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबची माहिती दिली आहे. या प्रसिद्धीपत्रकानुसार मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकणाऱ्या काही ठराविक गाड्यांच्या एक्स-शोरुम किंमती 5 हजाराने कमी (Maruti Suzuki Car Price cut) केल्या आहेत.

यात अॉल्‍टो 800 (Maruti Suzuki Alto 800), ऑल्‍टो के 10 (Maruti Suzuki Alto K10), स्विफ्ट डिजल (Maruti Suzuki Swift Diesel), सेलेरियो (Maruti Suzuki Celerio), बलेनो डिजल (Maruti Suzuki Baleno Diesel), इग्निस (Maruti Suzuki Ignis), डिजायर डीजल (Maruti Suzuki Dzire Diesel), टूर एस डीजल (Maruti Suzuki Tour S Diesel), विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) आणि एस-क्रॉस (Maruti Suzuki S-Cross) या गाड्यांचा समावेश आहे.

या सर्व गाड्यांची किंमत साधारण 2 लाख 93 हजारांपासून 11 लाख 49 हजारांपर्यंत आहे. मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, आज 25 सप्टेंबरपासून संपूर्ण देशभरात हे नवे दर लागू होणार आहेत. घटवलेली किंमत (Maruti Suzuki Car Price cut) ही कोणत्याही प्रमोशन ऑफर्सपेक्षा जास्त आहे. ही घट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केली आहे, असेही कंपनीने म्हटलं आहे.

“सणासुदीच्या काळात अशाप्रकारे नवनवीन ऑफर्सची घोषणा केल्याने ग्राहकांचे मनोबल वाढते. त्यामुळे अनेक ग्राहक गाड्या खरेदी करतात आणि बाजारात गाड्यांची मागणी वाढते. असे झाल्याने बाजारात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. गेल्याच आठवड्यात सरकारने कॉर्पोरेट कर कमी करण्यास सांगितल्यानतंर हे घट करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सरकारचे लक्ष हे ऑटो उद्योगातील मंदी दूर करणे हा आहे,” असेही कंपनीने म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI