AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या जावयाला अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई सफदर अवान (Safdar Awan Arrested) यांना अटक करण्यात आली आहे.

इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या जावयाला अटक
| Updated on: Oct 19, 2020 | 6:31 PM
Share

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई सफदर अवान (Safdar Awan Arrested) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दरवाजा तोडून कारवाई केल्याचा आरोप नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ (Maryam Nawaz Sharif) यांनी केला आहे. मरियम नवाज शरीफ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली (Maryam Nawaz Sharif husband Safdar Awan arrested in Pakistan).

मरियम शरीफ म्हणाल्या, “माझे पती सफदर अवान यांना पोलिसांनी कराचीतील एका हॉटेलमधून अटक केली आहे. पोलिसांनी हॉटेलच्या रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि माझे पती सफदर अवान यांना अटक केली.”

मरिअम यांच्याकडून एका रॅलीत इम्रान खानवर टीका

पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेत्या मरियम नवाज यांनी नुकतीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला होता. हे आंदोलन पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी आयोजित केलं होतं. यावेळी मरियम म्हणाल्या होत्या, “आपल्या विरोधातील पहिल्याच आंदोलनाला इम्रान खान घाबरले आहेत. इम्रान खान आपल्या सभांमध्ये मोकळ्या खुर्च्यांसमोर भाषण करतात. ते त्यांच्या कामाने लोकशाहीची कबर खोदत आहेत.”

पाकिस्तानमध्ये विरोधी पक्षांनी आघाडी तयार करत इम्रान सरकारला चांगलंच धारेवर धरायला सुरुवात केली आहे. या आघाडीत पीएमएल-एन, पीपीपी, जेयूआय-एफसह 11 पक्षांचा समावेश आहे. या आघाडीने पाकिस्तान सैन्याचे अत्याचार, भ्रष्टाचार, आर्थिक मंदी या मुद्द्यांवर पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनात सफदर अवान देखील सहभाग झाले होते. इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआय) पक्षाने या आंदोलनाविरोधात एफआयआर देखील दाखल केली आहे. यात त्यांनी विरोधी पक्षांवर गुंडगिरी केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा :

काँग्रेस पाकिस्तानमध्ये निवडणूक लढणार आहे का? संबित पात्रा यांचा शशी थरुर यांना सवाल

पाकिस्तान PoK मधून आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत विरोध कायम : सज्जाद राजा

Jannat Mirza | ‘पाकिस्तानी लोकांची मानसिकता खराब’ म्हणत, ‘टिकटॉक’ स्टारचा पाकिस्तानला ‘अलविदा’!

Maryam Nawaz Sharif husband Safdar Awan arrested in Pakistan

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.