पाकिस्तान PoK मधून आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत विरोध कायम : सज्जाद राजा

पाकिस्तान व्याप्त काश्मिरमधून पाकिस्तान आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहिलं, असं मत सज्जाद राजा यांनी व्यक्त केलं आहे.

पाकिस्तान PoK मधून आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत विरोध कायम : सज्जाद राजा

गिलगिट : पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील (Gilgit-Baltistan) नेते सज्जाद राजा (Sajjad Raja) यांनी पाकिस्तानकडून (Pakistan) जम्मू-काश्मिरवर (Jammu Kashmir) झालेल्या पहिल्या हल्ल्याचा दिवस म्हणजेच 22 ऑक्टोबर 1947 काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी गिलगिट-बाल्टिस्तानमधील नागरिकांना हा दिवस विरोध दिवस म्हणून पाळण्याचं आवाहन केलं आहे. जोपर्यंत पाकिस्तान व्याप्त काश्मिरमधून पाकिस्तान आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत हा विरोध कायम राहिलं, असंही सज्जाद राजा यांनी सांगितलं (Gilgit Baltistan activist Sajjad Raja resistance against Pakistan pok).

सज्जाद राजा यांनी ट्विट केलं, “22 ऑक्टोबरचा दिवस आपण विरोध दिवस म्हणून साजरा करायला हवा. पाकिस्तानने 22 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू-काश्मिरवर हल्ला केला आणि जम्मू काश्मिरची फाळणी झाली. मात्र जोपर्यंत पाकिस्तान या भागातून आपलं सैन्य आणि पाकिस्तानच्या सर्व नागरिकांना येथून मागे बोलावत नाही तोपर्यंत आमचा विरोध कायम राहिलं. पाकिस्तानच्या नियंत्रणाला आमचा स्पष्ट नकार आहे.”

“तो जम्मू-काश्मिरच्या इतिहासातील ‘सर्वात काळा दिवस”

दक्षिण आशियाच्या अभ्यासाठी नुकताच युरोपीय फाऊंडेशनने (EFSAS) नुकताच 22 ऑक्टोबरला जम्मू-काश्मिरच्या इतिहासातील ‘सर्वात काळा दिवस’ म्हटलं होतं. काश्मिरच्या या भागावर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून ऑपरेशन गुलमर्ग सुरु करण्यात आलं होतं.

“पाकिस्तानच्या हल्ल्यात 35,000 ते 40,000 काश्मिरी नागरिकांचा मृत्यू”

युरोपियन थिंक टँकने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मू-काश्मिरमधील जवळपास 35,000 ते 40,000 रहिवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच जम्मू-काश्मिरची विभागणी देखील झाली होती.

“गिलगिट-बाल्टिस्तानवर हल्ला करणारे हेच जम्मू काश्मिरचे सर्वात मोठे शत्रू आहेत. 22 ऑक्टोबर 1947 चा हल्ला जम्मू-काश्मिरच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे,” असंही युरोपियन थिंक टँकने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनाचं हसत हसत स्वागत, हे माझं हिंदुत्व नाही : उद्धव ठाकरे

‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, मग बाईसाहेब मुंबईत पर्यटनासाठी आला होता का?’ नितीन राऊतांचा कंगनाला सवाल

पाकिस्तानशी बोलणी झालीच, तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर : राजनाथ सिंह

Gilgit Baltistan activist Sajjad Raja resistance against Pakistan pok

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *