मोफत गिरण, मोफत आरओचं पाणी, मोफत विजेची तयारी, घरांवर महिलांची नावं, झक्कास मेहेरगावची यशोगाथा!

नावीन्यपूर्ण प्रकल्पांमुळे खानदेशातील विकासाचे मॉडेल म्हणून हे गाव उदयास येत आहे. सीसीटीव्ही, डिजीटल शाळा, मोफत पिठाची गिरणी ते मोफत आरो पाणी, सोलर प्लांट अशा सुविधांची उभारणी करण्यात आलीय.

मोफत गिरण, मोफत आरओचं पाणी, मोफत विजेची तयारी, घरांवर महिलांची नावं, झक्कास मेहेरगावची यशोगाथा!
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 1:46 PM

जळगाव- जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मेहेरगावानं आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केलीय. नावीन्यपूर्ण प्रकल्पांमुळे खानदेशातील विकासाचे मॉडेल म्हणून हे गाव उदयास येत आहे. सीसीटीव्ही, डिजीटल शाळा, मोफत पिठाची गिरणी ते मोफत आरओ पाणी, सोलर प्लांट अशा सुविधांची उभारणी करण्यात आलीय. गावानं एकीच्या बळावर 9 पुरस्कारही मिळवले आहेत. संपूर्ण गावाला मोफत वीज पुरवठा करण्याचा संकल्प केला असून तो लवकरचं पूर्ण होणार असल्याची माहिती गावच्या संरपंच छाया पाटील यांनी दिली. (Mehergaon village in Jalgaon role model of development for other villages in Maharashtra )

नऊ पुरस्कारांवर कोरलं नाव

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पासून 16 किलोमीटरवर मेहेरगाव आहे. या गावाची लोकसंख्या ही जवळपास एक हजार आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला हागणदारी मुक्तीचा उत्सव या गावानं आयोजित केला होता. गावातील नावीन्यपूर्ण प्रकल्पांमुळे मेहेरगावाने आतापर्यंत नऊ पुरस्कार मिळवले आहेत. यात संत गाडगेबाबा निर्मलग्राम पुरस्कार , पेपरलेस ग्रामपंचायत पुरस्कार , स्वर्गीय वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार ,पाणी फाऊंडेशन पुरस्कार अशा पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.

बक्षिसाच्या रकमेतून सोलर प्लांट, आरओ पाण्याची सुविधा

mehergaon

मेहेरगावातील वॉटर प्लांट

मेहेरगावाला मिळालेल्या पुरस्कारातूंन सुमारे 60 लाखांची रक्कम बक्षीस रूपाने मिळाली आहे. बक्षीस मिळालेल्या रकमेचा ग्रामपंचायतीने गावातील विकासासाठी उपयोग केला आहे. ग्रामपंचायतीने गावासाठी 10 केव्हीचा सोलर प्लांट खरेदी केला आहे. या सोलर प्लांट च्या माध्यमातून संपूर्ण गावासाठी मोफत पिठाची गिरणी व मोफत आरओ प्लांट उभारण्यात आलाय. संपूर्ण गावाला आरओचे पाणी मोफत दिले जाते.

संपूर्ण गावाला मोफत वीज देण्याचा संकल्प

mehergaon solar plant

सोलर प्लांटमधून गावातील काही घरांना वीज पुरवठा सुरू आहे

सध्या कार्यान्वित असलेल्या सोलर प्लाँटमधून काही घरांना मोफत वीज पुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच संपूर्ण गावाला मोफत वीज पुरवठा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचा सोलर प्लॅन्ट उभारला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात या गावातील प्रत्येक घरात मोफत वीज पुरवठा होणार आहे.

पथदिव्यांवरिल खर्च विकासकामांसाठी

मेहेरगावात सौर ऊर्जेवरील पथदिवे ही बसवण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतीचा विजेवर होणारा खर्च वाचला असून त्याचा उपयोग गावातील इतर विकासकामांसाठी केला जातो. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

डिजीटल शाळा

mmehergaon digital class room

मेहेरगावातील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा डिजीटल करण्यात आल्यात.

मेहेर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी ही संपूर्ण डिजिटल असून त्यामुळे गावातील मुलांना शहराकडे जाण्याची गरज भासत नाही. मेहेरगावचा सर्वांगीण विकास पाहता गावातील तरुणांसाठी मोफत अभ्यासिका, व्यायाम शाळा, सामाजिक सभागृह ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आले आहे.

राज्यातील पहिला हागणदारीमुक्त गाव उत्सव

गावात आज 8 ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली असून यासह घरोघरी शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे 100% हागणदारी मुक्त गाव म्हणून राज्यातील पहिला हागणदारीमुक्त उत्सव येथे घेण्यात आला. संपूर्ण गावात सिमेंटचे रस्ते बांधण्यात आले असून ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी ओला व कोरडा कचरा साठविण्यासाठी घरोघरी मोफत कचरापेट्या देण्यात आल्या आहेत.

घरावर महिलांचे नाव

या गावाचे अजून एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांना योग्य सन्मान मिळावा यासाठी गावातील प्रत्येक घरावर घरातील महिलेचे नाव लावण्यात आले आहे. आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांनी मेहेरगावाची ओळख एक मॉडेल विकासाचे मॉडेल म्हणून निर्माण होत आहे.

वृक्षारोपणासाठीही मेहेरगाव अग्रेसर असून गावातील प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करावे, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक नागरिकांच्या नावे वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली जातात.

कोरोनामुक्त गावं

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकीकडे राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना जळगाव जिल्ह्यात ही अमळनेर तालुका कोरोनाचा होस्टपॉट ठरला. मात्र, मेहेरगावात एकही कोरोना रुग्ण आढळला नसून अद्यापही कोरोनामुक्त आहे.

गावाला राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय असे एकूण नऊ पुरस्कार मिळाले, त्याच्या रक्कमेतून पिठाची गिरणी, आर ओ पाणी सोलर प्लाँट अशा सुविधांची निर्मिती केली. लवकरच संपूर्ण गावाला मोफत वीज पुरवठा करणार असल्याचं सरपंच छाया पाटील यांनी सांगितले.  मोफत पिठाची गिरणी, आरओ पाणी यामुळं आर्थिक बचत होत असल्याची भावना पूनम पाटील यांनी सांगितले.

Mehergaon floor mill

मोफत पिठाची गिरणी

संबंधित बातम्या :

नागपूर : दुष्काळात ‘खजूर’ शेती ! विदर्भातील शेतकऱ्याची यशोगाथा

मॅजिक नाही तर लॉजिक, नोकरीनंतर शेतकऱ्याची सेकंड इनिंग, खजूर शेतीतून 8 लाखाचं उत्पन्न

(Mehergaon village in Jalgaon role model of development for other villages in Maharashtra )

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.