Gold Rate | जळगावात सोन्याचे दर पुन्हा गडगडले, तोळ्याचा भाव…..

Gold Rate | जळगावात सोन्याचे दर पुन्हा गडगडले, तोळ्याचा भाव.....

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने चांदीच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने जळगावमध्ये सोन्याचे दर 600 रुपयांनी घसरले. (Gold Rates decreased in Jalgaon)

Yuvraj Jadhav

|

Sep 24, 2020 | 6:39 PM

जळगाव- गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सुवर्ण बाजारात अस्थिरता निर्माण झालीय. त्याचा परिणाम अजूनही दिसत आहेत. जळगावातील सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले. आज(गुरुवार) सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर 600 रुपयांनी घसरले. सोन्याचा दर प्रतितोळा जीएसटीसह 51 हजार 200 रुपये तर चांदीचा दर जीएसटीसह 59 हजार 500 रुपये प्रतिकिलो असा होता (Gold Rates decreased in Jalgaon)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी खरेदी वाढली

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत, अशी माहिती जळगावातील सोने व्यापाऱ्यांनी दिली.

सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदी व विक्रीला प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंचे दर अस्थिर आहेत.

दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने व चांदी विक्रीला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतातील बाजारपेठेत सोने व चांदीचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली जात आहे.

सोने चांदीचे दर कमी होण्याची शक्यता

जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खूप अस्थिरता असल्याचे सांगितले. या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोने-चांदीची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दर घसरत आहेत. आता यापुढे नेमकी काय परिस्थिती राहील, हे अनिश्चितच आहे. मात्र, सोने अजून 3 ते 4 हजार रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे. चांदीचे दर देखील अजून खाली येऊ शकतात. सध्या सोने व चांदीचे दर सतत बदलत असल्याने  ग्राहक संभ्रमात आहेत. या साऱ्या गोष्टीमुळे सुवर्ण बाजाराच्या उलाढालीवर परिणाम झाल्याचे लुंकड म्हणाले.

संबंधित बातम्या:

Gold Price: सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची घट, तोळ्याचा भाव …

Jalgaon Gold Rate | सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, सोने प्रतितोळे 5 हजारांनी स्वस्त

(Gold Rates decreased in Jalgaon)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें