ज्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली, तिच्यावर नेमकं काय म्हणाले संजय राठोड? वाचा सविस्तर

शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड आज पहिल्यांदाच माध्यमांना सामोरे गेले (Minister Sanjay Rathore first reaction on Pooja Chavan Case).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:22 PM, 23 Feb 2021
ज्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली, तिच्यावर नेमकं काय म्हणाले संजय राठोड? वाचा सविस्तर

यवतमाळ :  शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड आज पहिल्यांदाच माध्यमांना सामोरे गेले. ते पूजा चव्हाणच्या आत्महत्येवर नेमकं काय बोलणार याची उत्सुकता फक्त बंजारा समाजालाच नाही तर महाराष्ट्राला होती. पण त्यांच्या छोट्याशा पत्रकार परिषदेत संजय राठोड यांनी पूजावर फार काही बोलणं टाळलं (Minister Sanjay Rathore first reaction on Pooja Chavan Case).

पूजा चव्हाणवर नेमकं संजय राठोड काय म्हणाले?

जवळपास 15 दिवसानंतर संजय राठोड आज माध्यमांसमोर आले. पोहोरादेवीगडावर सर्व समाध्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे एवढीच चालली. पण पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी पूजा चव्हाणचं नाव घेऊन केली. ते म्हणाले, पूजा चव्हाण ही आमच्या गोर बंजारा समाजातील तरुणी होती आणि तिचा पुण्यात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचं आमच्या गोर बंजारा समाजाला अत्यंत दु;ख झालं आहे. चव्हाण कुटुंबाच्या दु:खात मी आणि आमचा सर्व समाज सहभागी आहे. यानंतर मात्र त्यांनी पूजाचं पुढे कुठेही नाव घेतलं नाही.

अरुण राठोडवर बोलायचं का टाळलं संजय राठोडांनी?

संजय राठोड यांच्या ह्या छोटेशा पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काही प्रश्न विचारले पण त्यांना थेट उत्तर न देता पोलीस चौकशीत सर्व काही समोर येईल असं संजय राठोड बोलत राहीले. त्यातच एका पत्रकाराने संजय राठोड यांना अरुण राठोडबद्दलही प्रश्न विचारला पण वनमंत्र्यांनी तो सवाल ऐकूणही थेट उत्तर देणं टाळलं. आता मी ह्या प्रकरणावर काही बोलणार नाही असही ते म्हणाले (Minister Sanjay Rathore first reaction on Pooja Chavan Case).

काय आहे पूजा चव्हाण-संजय राठोड-अरुण राठोड कनेक्शन?

पूजा चव्हाण ह्या तरुणीनं काही दिवसांपुर्वी पुण्यात आत्महत्या केली. ती मुळची परळीची. तिच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचा आवाज असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. संजय राठोड यांच्यासोबतच्या संबंधांमुळेच पूजानं आत्महत्या केल्याचा आरोपही विरोधी पक्षानं केला आहे. त्याच क्लीपमध्ये अरुण राठोडचा आवाजही असल्याचं सांगितलं जात आहे. तो पूजाचा मित्र असून संजय राठोडसाठी काम करत असल्याचं बोललं जातं आहे.

हेही वाचा : एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती