लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग, राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार? मनसे आमदार राजू पाटलांचा गृहमंत्र्यांना सवाल

मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यात दिशा कायदा कधी लागू करणार? असा प्रश्न विचारला आहे (MNS MLA Raju Patil ask question on Kalyan Young Girl Molested In Local train).

लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग, राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार? मनसे आमदार राजू पाटलांचा गृहमंत्र्यांना सवाल
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 11:31 PM

ठाणे : कल्याण ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान एका धावत्या लोकलमध्ये दोन इसमांनी एका तरुणीचा विनयभंग करत तिला लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र धाडसी तरुणीने प्रतिकार केल्याने ती बचावली. इतकेच नाही प्रसंगावधान राखत तिने आरोपीचे फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे आरोपीना अटक झाली. या प्रकरणाचा दाखला देत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यात दिशा कायदा कधी लागू करणार? असा प्रश्न विचारला आहे (MNS MLA Raju Patil ask question on Kalyan Young Girl Molested In Local train).

“25 तारखेला आठगाव ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. बंदी असताना या तरूणांनी रेल्वेत प्रवास कसा केला? असे गुन्हे रोखण्यासाठी दिशा ॲक्ट राज्यात कधी लागू होणार का?”, असं राजू पाटील म्हणाले.

 नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कसारा येथे राहणाऱ्या एक 21 वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये मोठ्या पदावर कामाला आहे. ही तरुणी दररोज कसारा ते ठाणे दरम्यान लोकलने प्रवास करते. नेहमीप्रमाणे 25 नोव्हेंबरला ही तरुणी ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात चढली. त्यावेळी लोकलमध्ये अनेक महिला होता.

मात्र आठगाव स्थानकापर्यंत ही ट्रेन रिकामी झाली होती. त्यामुळे त्या लोकलच्या डब्ब्यात ही तरुणी एकटीच होती. यावेळी आठगाव स्थानकावरुन रेल्वे गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. तिने लगचे तिच्या मोबाईलवर दोघांचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले.

या दरम्यान या दोघांनी तरुणीचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. या तरुणीने शेवटपर्यंत प्रतिकार करत होते. या झटापटीत तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत गाडी कसारा स्थानकात पोहोचली होती. त्यावेळी एक तरुण पसार झाला.

तर दुसऱ्या आरोपीला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपी अमोल जाधव आणि अमन हिले हे दोघे ठाण्याला एका कंपनीत कामाला आहेत. या दोन्ही आरोपींच्या विरोधात 307, 354 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे (MNS MLA Raju Patil ask question on Kalyan Young Girl Molested In Local train).

संबंधित बातम्या :

कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.