पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, शिवसेनेचा पुन्हा राणेंवर हल्ला

पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं.

पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, शिवसेनेचा पुन्हा राणेंवर हल्ला
Akshay Adhav

|

Oct 26, 2020 | 11:15 PM

रत्नागिरी : पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना, ‘येत्या काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन’, असं विनायक राऊत म्हणाले. (Mp Vinayak Raut Slam Narayan Rane)

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. राणे कुटुंबाच्या वाटेला जाऊ नका नाहीतर मातोश्रीच्या आत-बाहेर काय चालतं हे सगळं बाहेर काढीन आणि ते तुम्हाला जड जाईन, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

राणेंच्या टीकेवर विनायक राऊत म्हणाले, “पावसाळा संपला असला तरी या बेडकांची डरावडराव गिरी संपलेली नाही. पण त्यांच्या डराव-डराव गिरीला कोणी घाबरत नाही. येत्या काही काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन”.

नारायण राणेंनी आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत बुद्धू मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला तसंच उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची लायकी नाही, असं राणे म्हणाले. यावर बोलताना राऊत म्हणाले, “नारायण राणे तुम्हाला माझा एकच सल्ला आहे, तुम्ही मुख्यमंत्री होतात. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीला तुम्ही उद्देशून वापरलेले शब्द न शोभणारे आहेत”.

शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये आता चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पिता पुत्रांवर तोफ डागली तसंच त्यांना बेडकाची उपमा दिली. त्यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तुमची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची लायकी नाही. आपण शेळपट मुख्यमंत्री आहात, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं.

बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं- नारायण राणे

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते. आत्ता कुठे एका दौऱ्याला ते बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक पदं दिलं. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं. ते जास्त बोलले तर 47 वर्षात जे केलं ते सर्व बाहेर काढेल, असा इशारा राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

(Mp Vinayak Raut Slam Narayan Rane)

संबंधित बातम्या

संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?; नारायण राणेंची टीका

आज स्पष्ट बोलतोय, सुशांतची आत्महत्या नव्हे तर खून, आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील : नारायण राणे

ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय, राणेंची घणाघाती टीका

Narayan Rane | दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें