AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tahawwur Rana arrest | मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक, भारतात आणण्याच्या हालचाली

मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर राणा (Tahawwur Rana caught in America) याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.

Tahawwur Rana arrest | मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक, भारतात आणण्याच्या हालचाली
| Updated on: Jun 20, 2020 | 11:17 AM
Share

वॉशिंग्टन : मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक तहव्वुर राणा (Tahawwur Rana caught in America) याला अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे. 59 वर्षीय राणाला मुंबई हल्ल्याशी संबंधित एका प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा झाली होती. अमेरिकेतही त्याला दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, त्याची तब्येत खराब असल्याने मागील आठवड्यात लॉस एन्जेलिसच्या तुरुंगातून ठरलेल्या शिक्षेपेक्षा आधीच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं.

तहव्वुर राणाला सोडल्यानंतर दोनच दिवसात अटक करुन पुन्हा ताब्यात घेण्यात आले. आता त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारताने मुंबई हल्ल्याप्रकरणी याआधीच अमेरिकेकडे प्रत्यर्पणाची मागणी केली होती. याबाबतचं प्रकरण अमेरिकेत अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे अमेरिका राणाला भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो.

अमेरिकी वकिलांनी सांगितलं, “आरोपी तहव्वर राणा याने शिकागोमध्ये दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्याची ही शिक्षा 2021 पर्यंत होती.” राणा भारतात 2011 मुंबईत हल्ला केल्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे. या हल्ल्यात जवळपास 160 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मुंबई हल्ल्यानंतर त्याला अमेरिकेतील लॉज एन्जेलिस येथे पकडण्यात आले होते.

पाकिस्तानी मूळ असलेल्या आणि सध्या कॅनडाचं नागरिकत्व घेतलेल्या तहव्वुर राणाला भारतात मुंबई हल्ल्याप्रकरणी (26/11) दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणी 2013 मध्ये त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.

हेही वाचा :

राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा, स्वाभिमानीतील वाद मिटला

पुणे महापालिकेची इमारतच ‘हॉट स्पॉट’ ठरण्याची भीती, नगरसेवकांसह तब्बल 108 कर्मचाऱ्यांना संसर्ग

Lockdown : लॉकडाऊनमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अपघातात पाचपटीने घट

Mumbai attack accused Rana caught in America

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.